कोरोनाबाधीत गर्भवती मातांची यशस्वी शस्त्रक्रिया; आणि बाळ ही सुखरूप !

महिलेचे सिझेरियन करण्याचा निर्णय घेण्यात आला. साडेआठ महिन्यांच्या या गर्भवती महिलेची सुखरूप प्रसूती झाली.
surgery
surgerysurgery

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (Government Medical College and Hospital jalgaon) येथील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात दोन १९ वर्षीय गंभीर महिलांच्या ( pregnant woman) सुखरूप प्रसूती करून मातांचा जीव वाचविण्यात (Saving lives) वैद्यकीय पथकाला (Medical Squad) यश आले. (coron positive pregnant mothers successful surgery)

surgery
अपर जिल्हाधिकारी उतरले नदी पात्रात..वाळू उत्खननाची केली पाहणी !

पहिल्या घटनेत मुक्ताईनगर तालुक्याच्या शहरात राहत असलेल्या एका कामगाराच्या १९ वर्षीय गर्भवती पत्नीला २६ एप्रिलला अचानक झटके येऊन तोंडाला फेस आला. काही क्षणात ती बेशुद्ध झाली. तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची ऑक्सिजन पातळी खालावली होती. तसेच कोरोना अहवालदेखील पॉझिटिव्ह होता. विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी तपासले असता, महिलेचे सिझेरियन करण्याचा निर्णय घेण्यात आला. साडेआठ महिन्यांच्या या गर्भवती महिलेची सुखरूप प्रसूती झाली. बाळाचे वजन दोन किलो शंभर ग्राम होते. आज माता व बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. बाळ कोरोना निगेटिव्ह आहे. प्रसूती शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी भूलतज्ज्ञ डॉ. सचिन पाटील, डॉ. काजल साळुंखे यांच्यासह स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. राहुल पाटील, डॉ. संतोष पोटे, डॉ. सोनाली मुपाडे, डॉ. सुधीर पवनकर, बालरोग विभागाच्या डॉ. शैलेजा चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

surgery
‘आरटीपीसीआर’ चाचणी सक्तीमुळे खरेदी-विक्री नोंदणी व्यवहारात घट !

दुसऱ्या घटनेत, जळगाव शहरातील गर्भवती महिलेला एचआयव्ही आजारासह कोरोनाची देखील बाधा झाली होती. २८ एप्रिलला तिची सोनोग्राफी झाली तेव्हा त्यात ३० आठवड्यांच्या मृत गर्भांचे निदान झाले. श्वास घेण्यासही या महिलेला त्रास होता. या महिलेला ३० एप्रिलला शासकीय रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले. या महिलेचे पती पुणे येथील एका कंपनीत कामगार आहेत. तेपण एचआयव्हीबाधित आहेत. डॉ. संजय बनसोडे यांनी सुलभ प्रसूतीचा निर्णय घेतला व उपचार सुरू केले. ३० एप्रिलला रात्री ११ वाजता प्रसूती करण्यात आली. मात्र दुर्दैवाने बाळ पूर्वीपासूनच गर्भातच मृत होते, तर मातेचा जीव वाचला.

स्त्री व प्रसूती विभागाचे प्रयत्न

दोन्ही महिलांचा हिमोग्लोबिन हा सहा होता. त्यांना रक्ताच्या पिशव्या चढवाव्या लागल्या. अवघड शस्त्रक्रिया करून त्यांचा जीव वाचविला. विभागप्रमुख डॉ. बनसोडे, डॉ. कांचन चव्हाण, डॉ. हेमंत पाटील, शीतल ताठे, परिचारिका नीला जोशी, लता सावळे यांनी प्रसूतीकामी परिश्रम घेतले.

(coron positive pregnant mothers successful surgery)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com