esakal | जळगाव जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या तीनशेच्या टप्प्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Patient

जळगाव जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या तीनशेच्या टप्प्यात

sakal_logo
By
टीम ई सकाळजळगाव : जिल्ह्यात कोरोना (corona) संसर्गाचा उतरता आलेख कायम आहे. बुधवारी (ता. ७) प्राप्त अहवालानुसार दिवसभरात नवे १५ बाधित (Patient) आढळून आले, तर बरे होणाऱ्यांचा आकडा ५० होता. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन ती आता तीनशेच्या टप्प्यात आली आहे. (jalgaon corona active patient number three hundred stages)

हेही वाचा: हवेतून ऑक्सीजनची निर्मीती; आठवड्याभरात प्रकल्प सुरु होणार

जळगाव जिल्ह्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा उतरता आलेख कायम आहे. मार्च व एप्रिलपर्यंत ‘पीक’वर असलेला संसर्ग आता जुलैत नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. बुधवारी चार हजार ७४२ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी केवळ १५ जण बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता एक लाख ४२ हजार ४१० झाली आहे. दिवसभरात ५० रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३९ हजार ५०६ वर पोचला आहे.

मृत्यूची नोंद नाही

सलग चौथ्या दिवशी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असून, आता अवघे ३३१ सक्रिय रुग्ण राहिले. पैकी ९९ लक्षणे नसलेले, तर २३२ लक्षणे असलेले रुग्ण आहेत.

हेही वाचा: भरदिवसा यावलमध्ये थरार..डोक्याला बंदूक लावून सराफ दुकान लुटले

...असे आढळले रुग्ण
बुधवारी जळगाव शहरात चार, भुसावळ तालुका तीन, अमळनेर एक, चाळीसगाव सहा, असे रुग्ण आढळून आले. अन्य १२ तालुक्यांत एकाही रुग्णाची नोंद नाही.

loading image