esakal | भरदिवसा यावलमध्ये थरार..डोक्याला बंदूक लावून सराफ दुकान लुटले
sakal

बोलून बातमी शोधा

भरदिवसा यावलमध्ये थरार..डोक्याला बंदूक लावून सराफ दुकान लुटले

भरदिवसा यावलमध्ये थरार..डोक्याला बंदूक लावून सराफ दुकान लुटले

sakal_logo
By
राजू कवडीवाले

यावल : येथे शहरात कोर्ट रस्त्यावरील व गजबजलेल्या वस्तीत असलेल्या शिवसेना शहरप्रमुख (Shiv Sena mayor) जगदीश कवडीवाले यांचे बाजीराव काशिदास कवडीवाले या ज्वेलरी दुकानात (Jewelry shop) बुधवारी (ता.७) दुपारी एक वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत जगदीश कवडीवाले यांचे कानशिलावर बंदूक (Gun) ठेवत दुकानातील शोकेस फोडून सोन्याचे चांदीचे सर्व दागिने लंपास केले आहेत. दुकानातून किती माल चोरीस गेला याबाबत अध्याप अधिकृत आकडा समजू शकला नाही.

(robbery at a jewelery shop in yaval town)

हेही वाचा: पाऊस लांबल्याने जळगाव जिल्ह्यात पाणी टँकरच्या संख्येत वाढ

शिवसेनेचे शहर अध्यक्ष तथा ज्वेलरी दुकानचे संचालक जगदीश कवडीवाले हे दुपारी दुकानात असताना २० ते २५ वयोगटातील चार तरुणांनी दुकानात प्रवेश करत सुरुवातीला बोटाकडे इशारा करत अंगठी बनवण्याचा इशारा केला. व लगेच कवडीवाले यांच्या मानेवर पिस्तोल ठेवत शोकेस फोडून त्यातील सोन्याचा माल लंपास केला. दुकानाचे बाहेर गेल्यानंतर कवडीवाले यांनी आरडा...ओरड करताच दुचाकीवर चार जणांनी बसून रस्त्याने पोबारा केला.

हवेत गोळीबार..

दागीने लुटून चोर पळत असतांना परिसरातील तरुणांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पसार होण्यात यशस्वी झाले. यांनी य त्यांचे पिस्तोल मधून हवेत गोळीबार केल्याची चर्चा आहे. त्यांचे कडील दोघं पिस्तोल रस्त्यावर पडलेले आढळले. यातील एक जण घोबी गल्लीतून बस मळ्याकडे गेल्याचे प्रत्यक्ष प्रर्शीनी सांगितले.

हेही वाचा: केरळचे वायनाड पर्यटनासाठी आहे प्रसिध्द; जाणून घ्या माहिती

व्यापारी भयभीत..

मंगळवारीही सातोद रस्त्यावर दुपारी एक वाजेच्या सुमारास एकास मिरची पूड टाकून लूटले आहे. दरम्यान भररस्त्यावर सराफ बाजारात घटना घडल्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिक भयभित झाले आहेत. गेल्या दोन दिवसापासून भर दुपारी होत असलेल्या या घटनांमुळे तालुक्यात घबराट निर्माण झाली असून पोलिस यंत्रणा कुचकामी ठरत असल्याची चर्चा आहे.

loading image
go to top