जळगाव जिल्ह्याला दिलासा; कोविड सेंटरमधे राहिले ३७ रुग्ण !

सचिन जोशी
Tuesday, 3 November 2020

सोमवारी जळगाव शहरात केवळ दोन रुग्ण आढळून आले होते. मंगळवारी मात्र पुन्हा २८ रुग्णांची भर पडली. मात्र, शहरातील ५१ रुग्ण बरे होऊन घरीही गेले.

जळगाव : जिल्ह्यात दीड महिन्यापासून कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असून त्यामुळे जिल्हा कोविड केअर सेंटरमधील रुग्णांची संख्या अवघी ३७ एवढी मर्यादित राहिली आहे. मंगळवारी अडीच हजारांवर प्राप्त अहवालात नवे ६४ रुग्ण आढळले, तर ९१ रुग्ण बरे झाले. दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही. 

आवश्य वाचा- महाजनांच्या बालेकिल्यात भाजपला सुरूंग; भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत !
 

जळगाव जिल्ह्यात दोन महिन्यांतील कोरोना संसर्गाचे चित्र दिलासादायक आहे. १७ सप्टेंबरपासून सातत्याने रुग्णसंख्या घटत आहे. दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या आतापर्यंतची निचांकी नोंदली गेली आहे. मंगळवारी दिसवभरात आणखी ६४ रुग्णांची भर पडून एकूण रुग्णसंख्या ५३ हजार ३२९ झाली. तर ९१ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे झालेल्यांचा आकडाही ५१ हजार ३६७वर पोचला आहे. रिकव्हरी रेट ९६.३२ टक्क्यांवर पोचला आहे. गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, हीदेखील दिलासादायक बाब आहे. 

जळगावात वाढले रुग्ण 
सोमवारी जळगाव शहरात केवळ दोन रुग्ण आढळून आले होते. मंगळवारी मात्र पुन्हा २८ रुग्णांची भर पडली. मात्र, शहरातील ५१ रुग्ण बरे होऊन घरीही गेले. सध्या जळगाव शहरात २९९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर २८, जळगाव ग्रामीण ४, भुसावळ ९, अमळनेर ५, चोपडा ६, धरणगाव १, यावल १, जामनेर २, रावेर १, पारोळा २, बोदवड ३. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona center in Jalgaon district, only thirty-seven patients were admitted