esakal | महाजनांच्या बालेकिल्यात भाजपला सुरूंग; भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत !
sakal

बोलून बातमी शोधा

महाजनांच्या बालेकिल्यात भाजपला सुरूंग; भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत !

काही लोक म्हणताहेत नाथाभाऊसोबत कोणीच पदाधिकारी, नेता गेला नाी. परंतु, थोडे दिवस थांबा.. दिवाळीनंतर जळगाव येथे भव्य प्रवेश सोहळा घेऊन कोण कोणासोबत आहे, हे दाखवून देऊ.

महाजनांच्या बालेकिल्यात भाजपला सुरूंग; भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत !

sakal_logo
By
दिपक चौधरी

मुक्ताईनगर : माजीमंत्री एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेशानंतर भाजपला आज पहिला मोठा धक्का बसला. भाजपनेते गिरीश महाजनांचा बालेकिल्ला असलेल्या जामनेर तालुक्यातील देवपिंप्री आणि नेरी येथील दोनशे भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत खडसेंचे नेतृत्व स्वीकारले. स्वत: खडसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. 

आवश्य वाचा- टोलप्लाझाचा अजब तर्क; अपघाताचे खापर फोडले फुलझाडांवर आणि केली कत्तल !
 

यांनी केला प्रवेश 
सुरत येथील उद्योजक आबा पाटील, रवींद्र पाटील, आणि देवपिंप्री बाळू पाटील, गोपाळ पाटील, सुभाष त्र्यंबक पाटील, अनिल सखाराम पाटील, गणेश बोरसे, तुळशीराम डोंगरे, दामू चिकटे,पोपट शेळके, 
नेरी बु. येथील प्रमोद खोडपे, जयेश पाटील,सुरेश पाटील, दत्ता वाघोडे, विशाल कोळी, दानिश पिंजारी 

बेबीताई सखाराम पाटील, लताबाई भावलाल पाटील, सुशीलाबाई जगन्नाथ पाटील, कल्पना बाई बाळू पाटील, रत्नाबाई सुभाष पाटील यांच्यासह मुक्ताईनगर भाजप सरचिटणीस सुनील काटे,तालुका उपाध्यक्ष संदीप जावळे आणि जामनेर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. 
यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस ईश्वर राहणे, माजी सभापती विलास धायडे, जामनेर तालुका किसान सेल अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, गोटू मगर, शरद पाटील, सागर कुमावत, माजी सभापती राजू माळी यांच्यासह अन्य पदाधिकारी, कायकर्ते उपस्थित होते. 

प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा : खडसे 
यावेळी खडसेंनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, काही लोक म्हणताहेत नाथाभाऊसोबत कोणीच पदाधिकारी, नेता गेला नाी. परंतु, थोडे दिवस थांबा.. दिवाळीनंतर जळगाव येथे भव्य प्रवेश सोहळा घेऊन कोण कोणासोबत आहे, हे दाखवून देऊ. आता कार्यकर्ते प्रवेश करत असले तरी प्रत्येक कार्यकर्ता पक्षासाठी महत्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले.  

संपादन- भूषण श्रीखंडे 

loading image
go to top