esakal | जळगावात कोरोनाचे अवघे नवे पाच बाधित!
sakal

बोलून बातमी शोधा

corona

जळगावात कोरोनाचे अवघे नवे पाच बाधित!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : जिल्ह्यात कोरोना (corona) संसर्ग नियंत्रणात आल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. बुधवारी (ता. १४) सक्रिय रुग्णसंख्या (Active Patient) दोनशेच्या आत आली. दिवसभरात केवळ दोन तालुक्यांत अवघ्या पाच रुग्णांची नोंद झाली. उर्वरित १३ तालुक्यांमध्ये एकही नवीन रुग्ण आढळला नाही.
(jalgaon corona new patient numbers is low)

हेही वाचा: कोविड नसलेल्या गावात आज शाळांची घंटा वाजणार

जळगाव जिल्ह्याने कोरोना संसर्ग नियंत्रणाच्या प्रक्रियेत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. बुधवारी कोरोना चार निकषांत जळगावची कामगिरी उजवी ठरली. एकतर पहिल्या व दुसऱ्या लाटेत एका दिवसांत सर्वांत कमी म्हणजे अवघ्या पाच रुग्णांची नोंद झाली. हे पाचही रुग्ण केवळ भुसावळ व चाळीसगाव या दोनच तालुक्यांत नोंदले गेले. उर्वरित १३ तालुके निरंक राहिले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजार ४८० वर पोचली आहे. गेल्या २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही, तर नव्या बाधितांच्या तुलनेत दहापट म्हणजे ५३ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांचा आकडा एक लाख ३९ हजार ७१७ झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या प्रथमच दोनशेच्या आत आली असून, आता केवळ १८९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

जळगाव शहर दुसऱ्या दिवशी शून्य
हॉटस्पॉट ठरलेल्या जळगाव शहरातील स्थिती लक्षणीय सुधारतेय. शहरात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी एकही रुग्ण आढळला नाही, तर दिवसभरात पाच रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज मिळाला. शहरात आता अवघे ३५ सक्रिय रुग्ण आहेत. चाळीसगावला चार व भुसावळ तालुक्यात एक, असे पाच रुग्ण आढळून आले.

भडगाव कोरोनामुक्तीकडे
सुरवातीपासूनच कमी रुग्णसंख्या असलेला भडगाव तालुका कोरोनामुक्तीपासून अवघ्या दोन पावलांवर आहे. या तालुक्यात आतापर्यंत तीन हजार ५९६ रुग्ण होऊन गेलेत. पैकी तीन हजार ५१८ बरे झालेत, ७६ जणांचा मृत्यू झाला. आता अवघे दोन सक्रिय रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेला भडगाव पहिला तालुका ठरू शकेल, अशी स्थिती आहे.

loading image