जळगाव जिल्ह्यात आज २८५ कोरोना बाधित ...९ जणांचा मृत्यू 

भूषण श्रीखंडे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

जिल्ह्यातील रुग्णसंख्या ११ हजार ३८८ झाली आहे. आज देखील सर्वाधिक ७५ रुग्ण जळगाव शहरात वाढले आहेत. तक आज २८४ रुग्ण बरे झाले.

जळगाव  : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून रुग्ण बरे होणाऱयांची संख्या देखील वाढत आहे. त्यात कोरोना बाधितांच्या एकूण संख्येने ११ हजारांचा टप्पार पार असून आज (ता. १) दिवसभरात २८५ नवे बाधित आढळून आले आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या (२८४) आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ९रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या ५२७ झाली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये आठ रुग्ण पन्नाशीच्या वरील प्रौढ होते तर एक ४६ वर्षाचा महिला होती.
 
जळगाव जिल्ह्यात दररोज झापाट्याने कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णसंख्या वाढत आहे. आजही २८५ नवे बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या ११ हजार ३८८ झाली आहे. आज देखील सर्वाधिक ७५ रुग्ण जळगाव शहरात वाढले आहेत. तक आज २८४ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्यांची संख्या सात हजार ८४१ झाली आहे.  

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर-७५, जळगाव ग्रामीण- १८, भुसावळ- १२, अमळनेर- १६, चोपडा- २०, पाचोरा- २३, भडगाव- १२, धरणगाव-२५, यावल- एक,  जामनेर- ३५, रावेर- ९, पारोळा- सहा, चाळीसगाव- २७, मुक्ताईनगर- सहा, इतर एक.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona patient number of 285 and 9 deth