esakal | चाळीसगाव तालुक्यात कोरोणाचा विस्फोट ठरले डोकेदुखी
sakal

बोलून बातमी शोधा

चाळीसगाव तालुक्यात कोरोणाचा विस्फोट ठरले डोकेदुखी

कोरोनाबाधितांची संख्या वाढली तरी त्यासाठी बेडसची संख्या पुरेशी आहे असे आरोग्य यंत्रणा सांगत असले तरी कोरोनाची साखळी तोडणे हे मोठे आव्हान आहे.

चाळीसगाव तालुक्यात कोरोणाचा विस्फोट ठरले डोकेदुखी

sakal_logo
By
दिपक कच्छाव

 मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यात कोरोनाबाधितांचा दररोज विस्फोट होऊ लागला आहे. कोरोनाबधितांची संख्या धडकी भरवणारी आहे.सध्यास्थितीत दोन कोविड सेंटर कार्यान्वीत असून तेथे कोराबाधितांवर उपचार सुरु आहेत. गरज भासल्यास ट्रामा केअर सेंटरमध्येही उपाययोजना करण्यात आली आहे,मात्र दररोज होवू लागलेल्या पॉझिटीव्हच्या विस्फोटामुळे आरोग्य यंत्रणेसह तालुका प्रशासनाचीही डोकेदुखी वाढणार आहे,

चाळीसगाव तालुक्यात मे मध्ये कोरोनाबधित पहिला रूग्ण आढळून आला. त्यानंतर वेग अत्यंत कमी होता.तीन जनता कर्फ्यु लागल्याने कोरोनाची साखळी तोडण्यात काहीसे यश आले होते. त्यानंतर मात्र कोरोनाबाधित व कोरोना बळींचा आकडा वाढतच गेला.सध्या तालु्नयात बाधितांचा आकडा हा 411 असून आतापर्यंत 24 जणांचे बळी गेले आहेत.तर तब्बल 155 रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत.232 रूग्ण उपचार घेत आहेत. सध्या दररोज पॅाझिटीव्ह येणाऱ्या संख्येचा विस्फोट होत असला तरी रूग्णांसाठी बेडची कमतरता जाणवणार नाही अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे यांनी दिली.शहरात भडगाव रोडवरील अंधशाळेतील कोविड सेंटरमध्ये 55 बेडची व्यवस्था करण्यात आली असून धुळे रोडवरील डॉ. उत्तमराव महाजन वैद्यकीय महाविद्यालयात 100 ते 150 बेडची व्यवस्था आहे.तसेच नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या ट्रामा केअर सेंटरमध्येही कोविड सेंटर प्रस्तावित आहे.तालु्नयात एक आयसोलेशन कक्ष आहे.

महात्मा फुले योजनेतून मोफत उपचार

महात्मा फुले आरोग्य योजनेत जिल्ह्यातील घोषीत झालेल्या रूग्णालयात मोफत केले जात आहेत.कोरोनाच्या काळात ही योजना वरदान ठरत आहे.कोरोनाबाधित रूग्णांवर कमीत कमी 10 तर जास्तीत जास्त 12 दिवसापर्यंतचा खर्च शासनाकडून मोफत केला जातो.

तालुक्यात 108च्या 3 रूग्णवाहिका 

चाळीसगाव तालु्नयात 108 च्या 3 रूग्णवाहीका आहेत. त्यात चाळीसगाव, शिरसगाव व मेहूणबारे ग्रामीण रूग्णालय यांच्याकडे ही रूग्णपवाहीका असून त्यातील केवळ एकच रूग्णवाहीका कोरोना रूग्णांसाठी कार्यरत आहे.अन्य दोन रूग्णवाहीका प्रसुती, गंभीर रूग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 60वर्षाच्या आतील व्यक्तींवर चाळीसगाव येथेच कोविड सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत तर 60 वर्षावरील व्यक्तीस जळगावी कोविड सेंटरमध्ये दाखल केले जात आहे.

कसा कोरोनाचा रोखणार विस्फोट?

चाळीसगाव तालुक्यात कारोनाचा विस्फोट दिवसेंदिवस वाढत आहे. हा स्फोट कसा रोखणार असा सवाल निर्माण झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढली तरी त्यासाठी बेडसची संख्या पुरेशी आहे असे आरोग्य यंत्रणा सांगत असले तरी कोरोनाची साखळी तोडणे हे मोठे आव्हान आहे.चार पाच दिवसाच्या जनता कर्फ्यु वा लॉकडाऊनने ही साखळी तुटेल काय हे सांगता येत नाही.लोकांनीच यावर प्रभावी उपाययोजना केल्या तरच कोरोनाला थोपवणे श्नय आहे, अन्यथा औरंगाबाद, पुणे अशा शहरांसारखी चाळीसगावी गत झाल्याशिवाय राहणार नाही. शेजारच्या मालेगावने जो पॅटर्न राबविला तो चाळीसगावच्या प्रशासन राबवून प्रभावीपणे अंमलबजावणी करेल काय हा प्रश्न आहे.अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जावून हे शहरच लॉक करण्याची वेळ येईल. हे होवू द्यायचे नसेल तर नागरीकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.  

 
 

loading image