दिलासादायक; नव्या कोरोना बाधितांची नीचांकी संख्या 

सचिन जोशी
Friday, 15 January 2021

चाचण्या कमी होऊनही रुग्ण वाढल्याचे आकडेवारीवरुन दिसत होते. या वाढणाऱ्या रुग्णसंख्येत शुक्रवारी दिलासा मिळाला.

जळगाव  : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात येत असल्याचे चित्र असताना काही दिवसांपासून दररोज नवे रुग्ण वाढत होते. अशात काहीशी दिलासादायक रुग्णसंख्या शुक्रवारी नोंदली गेली. आतापर्यंतची जिल्ह्यातील नीचांकी म्हणजे दिवसभरात १३ रुग्ण आढळून आले. तर ३४ रुग्ण बरे झाले. मात्र, २४ तासांत दोघांच्या मृत्युमुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. 

आवश्य वाचा- चीन सोबतच्या युद्धात ते लढले आणि जखमी झाले; अखेर सैनिक दिनाला ते अनंतात विलीन 

 

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे चित्र काही दिवसांपासून दिसत होते. मात्र डिसेंबरच्या शेवटी व जानेवारीत दररोज आढळून येणारे रुग्ण वाढत होते. चाचण्या कमी होऊनही रुग्ण वाढल्याचे आकडेवारीवरुन दिसत होते. या वाढणाऱ्या रुग्णसंख्येत शुक्रवारी दिलासा मिळाला. दिवसभरात अवघे १३ रुग्ण आढळून आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५६ हजार ५५१ झाली आहे. तर ३४ रुग्ण बरे झाल्यामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा ५४ हजार ७२०वर पोचला आहे. गेल्या २४ तासांत जळगाव शहरातील ६० वर्षीय व भुसावळ तालुक्यातील ७२ वर्षीय पुरुष अशा दोघा रुग्णांच्या मृत्युमुळे बळींची संख्या १३४१ झाली आहे. 

वाचा- मतदान करुन घरी आला; आणि उचले टोकाचे पाऊल, घटना समजताच संपूर्ण गाव सुन्न 

दहा तालुके निरंक 
शुक्रवारी सर्वांत कमी म्हणजे जिल्ह्यात १३ रुग्ण आढळून आले असले तरी शुक्रवारी प्राप्त चाचण्यांचे अहवालही साडेसातशेपर्यंतच मर्यादित होते. त्यामुळेही रुग्ण कमी असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे १५ पैकी १० तालुक्यांत एकही रुग्ण सापडला नाही. जळगाव शहरात ३, भुसावळला ४, पारोळा, पाचोरा व चोपड्यात २ रुग्ण आढळून आले.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona patient number low