दिलासादायक : जिल्ह्याचा "रिकव्हरी रेट' 60 टक्‍क्‍यांपर्यंत 

corona
corona

जळगाव : ज्याप्रमाणे जिल्ह्याचा मृत्यूदर देशाच्या तुलनेत अधिक आहे. त्याच तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही राज्यात सर्वाधिक हे जळगाव जिल्ह्यातीलच आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या जरी दररोज शेकडोंनी वाढत असली तरी जिल्ह्यातील बरे होणाऱ्यांचे प्रमाण हे 60 टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे. तसेच जिल्ह्यातला मृत्यूदरही निम्म्यावर आला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. "कोरोना'बाधितांच्या संख्येत दररोज शेकडोंच्या संख्येत वाढ होत आहे. देशाच्या तुलनेत सर्वाधिक असलेला "कोरोना' रुग्णांचा मृत्युदर आटोक्‍यात आणण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण हे देशाच्या तुलनेत चारपट अधिक असल्याचे खुद्द राज्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे मृत्यूदर रोखणे व रुग्णांची संख्या कमी करणे हे दोन प्रमुख आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे होते. हे आव्हान पेलत आरोग्य यंत्रणेने जिल्ह्याचा मृत्यूदर हा निम्म्यावर आणला आहे. तसेच रविवारपर्यंत जिल्ह्यातील 2 हजार 459 रुग्णांपैकी 1 हजार 437 रुग्ण बरे झाले आहे तर 169 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

बरे होणाऱ्यांमध्ये अव्वल 
जिल्ह्याचा "रिकव्हरी रेट' हा राज्यात सर्वाधिक जळगाव जिल्ह्याचाच आहे. देशाचा रिक्‍व्हरी रेट हा 54 टक्के, राज्याचा 50.4 टक्के इतका आहे. जिल्ह्यातील बाधितांपेकी 1 हजार 437 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बरे होणाऱ्यांचे प्रमाण हे सहा टक्‍क्‍यांनी अधिक असून, जिल्ह्याचा "रिकव्हरी रेट' 59 टक्‍क्‍यांपर्यंत पोचत आहे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक बरे होणाऱ्यांचे प्रमाण पाहता जळगाव जिल्हा हा अव्वल ठरला आहे. 

मृत्यूदरही झाला कमी 
महिनाभरापूर्वी जिल्ह्याचा मृत्यूदर हा राज्याच्या तुलनेत चार पटीने अधिक होता. मात्र, आरोग्य यंत्रणेला हा मृत्यूदर आटोक्‍यात आणण्यात यश प्राप्त होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 2 हजार 459 रुग्णांपैकी 169 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महिनाभरापूर्वी 12 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असलेला मृत्यूदर आज 7 टक्‍क्‍यांवर आला असल्याने ही बाब जिल्हावासीयांना दिलासा देणारी ठरणार आहे. 

दोन महिन्यातील स्थिती 

तारीख एकूण रुग्ण मृत (टक्के) बरे झालेले (टक्के) 
1 मे 37 11 (29) 00 
8 मे 100 14 (14) 3 (3) 
15 मे 232 28 (12.6) 35(15.8) 
21 मे 346 38 (10.98) 133 (38.43) 
28 मे 523 64 (12.23) 218 (41.68) 

1 जून 751 81 (10.78) 258 (34.35) 
8 जून 1109 122 (11) 530 (47.79) 
15 जून 1728 141 (8.15) 770 (44. 56) 
22 जून 2459 169 (6.87) 1437 (58. 43) 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com