दिलासादायक : कोरोनामुक्‍तीत जळगाव देशात टॉपवर; मृत्‍यूदरही घटला

coronavirus
coronavirus
Updated on

जळगाव : जिल्ह्यात आज एकाचदिवशी १७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२ टक्क्यांपर्यंत वाढले असून हे प्रमाण देशाच्या व राज्याच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ८२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात आज कोरोनाच्या ३०४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या जिल्ह्यात २ हजार ५७९ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. 

पॉझिटीव्ह रूग्‍णांचा रेशीओ वीस टक्‍के
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरटीपीसीआर तपासणीबरोबरच रॅपिड ॲन्टीजन तपासणी सुरू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत ३८ हजार ८८२ कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहे. त्यापैकी २९ हजार ७१५ तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून ७ हजार ७९६ अहवाल आले पॉझिटिव्ह आले आहे. शिवाय इतर अहवालाची संख्या ४९१ असून अद्याप ८८० अहवाल प्रलंबित आहे. जिल्ह्यात संशयित म्हणून तपासणी करण्यात आलेल्या ३८ हजार ८३२ व्यक्तींपैंकी ७ हजार ७९६ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचा दर हा २० टक्के इतका आहे. 

उपचार घेत असलेले रूग्‍ण असे
जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेले २ हजार ५७९ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये १७५१, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये २६२, तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल मध्ये ५६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जळगाव शहर ८०९, जळगाव ग्रामीण १८८, भुसावळ २१२, अमळनेर ९२, चोपडा २५, पाचोरा ७६, भडगाव ३०, धरणगाव ११५, यावल ३२, एरंडोल १४५, जामनेर २५९, रावेर १४५, पारोळा ६४, चाळीसगाव १०१, मुक्ताईनगर ९४, बोदवड ५०, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १३ रुग्णांचा समावेश आहे. 

मृत्‍यूदर सात टक्‍क्‍यांनी घसरला
जिल्ह्यात आतापर्यंत ३९१ कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यापैकी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण हे ५० वर्षावरील तसेच त्यांना जुने आजार, विविध व्याधी असल्याचे निदान झाले आहे. मागील महिन्यापर्यंत १२ टक्क्यांवर असलेला जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा मृत्युदर प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजना तसेच लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहकार्याने ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यास प्रशासनास यश आले आहे. हा दर अजून कमी होण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले. 


संपादन : राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com