जळगाव जिल्ह्यात कोरोना चाचण्यांत पुन्हा वाढ; चार नवे रुग्ण आढळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Test

जळगाव जिल्ह्यात कोरोना चाचण्यांत पुन्हा वाढ; चार नवे रुग्ण आढळले


जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दररोजच्या कोरोना चाचण्या (Corona Test) दोन हजारांपर्यंत कमी झाल्या होत्या. त्या पुन्हा वाढविण्यात आल्या असून, बुधवारी तब्बल पाच हजार चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात केवळ चारच नवे रुग्ण (Patient)आढळले आहेत.

हेही वाचा: पालच्या सुकी नदीत सापडले सहा कोटी वर्पांपूर्वीचे नैसर्गिक खांब


जळगाव जिल्ह्यात गेल्या दीड-दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे. त्या पार्श्वभूमीवर चाचण्याही कमी करण्यात आल्या होत्या. महिनाभरापासून दररोज सरासरी दीड ते दोन हजार चाचण्या केल्या जात होत्या. मंगळवारपर्यंत हाच आकडा होता. मध्यंतरीच्या काही दिवसांत तर चाचण्यांची संख्या कमी होऊन हजारापर्यंत खाली आली होती.


दोन दिवसांपासून चाचण्यांत वाढ
दोन दिवसांपासून पुन्हा चाचण्या वाढविल्याचे चित्र दिसत आहे. मंगळवारी तीन हजारांवर चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले होते, तर बुधवारी दोन हजार १३४ आरटीपीसीआर, तर दोन हजार ९२२ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी आरटीपीसीआरमधील चार रुग्ण बाधित आढळले. गेल्या दोन महिन्यांपासून दररोज सरासरी पाच ते दहा रुग्ण आढळून येत होते. बुधवारी चाचण्या दुपटीने वाढूनही केवळ चारच रुग्ण आढळले.


तिसऱ्या लाटेसाठी सज्जता
दोन दिवसांपासून पुन्हा चाचण्या वाढविण्यामागे तिसऱ्या लाटेची तयारी असल्याचे सांगितले जात आहे. निती आयोगाने नुकताच अंदाज वर्तविताना ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, ही लाट रोखायची असेल तर चाचण्या वाढविण्यासह अन्य यंत्रणा सज्ज करण्यावर भर देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुरवातीचा टप्पा म्हणून चाचण्या वाढविल्या जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: अंजनी प्रकल्पातील जलसाठा सिंचनासाठी उपलब्ध व्हावा-आमदार पाटील

अशी आहे स्थिती
बुधवारी प्राप्त अहवालानुसार जळगाव शहरात एक व भुसावळ तालुक्यात तीन नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता एक लाख ४२ हजार ६९० झाली आहे, तर दिवसभरात चार रुग्ण बरे झाल्याने बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ४० हजार ९० वर पोचला आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत सक्रिय रुग्ण अवघे २५ असून, त्यांपैकी दोन ऑक्सिजनवर, तर चार रुग्ण आयसीयूत आहेत.

Web Title: Marathi News Jalgaon Corona Tests Increased In City

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..