अंजनी प्रकल्पातील जलसाठा सिंचनासाठी उपलब्ध व्हावा-आमदार पाटील

प्रकल्पातील जलसाठा नदीच्या पात्रातून आणि बंधाऱ्यातून केला जात असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात असल्याचे सांगितले.
Ajani Project
Ajani Project


एरंडोल ःअंजनी प्रकल्पात होणाऱ्या जलसाठ्याचा लाभ शेतकऱ्यांना (Farmer) मिळत नाही, पाणी वाटप व्यवस्था नसल्यामुळे शेतकरी सिंचनापासून वंचित राहत असून प्रकल्पातील जलसाठ्याचा लाभ शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार चिमणराव पाटील (MLA Chimanrao Patil) यांनी केली. तसेच पद्मालय येथील अपूर्णावस्थेत असलेल्या साठवण बंधाऱ्याच्या कामास गती मिळावी अशी मागणी केली. राज्य शासनाच्या अंदाज समितीच्या सदस्यांनी (State Governance Estimates Committee) आज पद्मालय येथील अपूर्णावस्थेत असलेल्या साठवण बंधारा आणि अंजनी प्रकल्पास (Project) भेट देऊन पाहणी केली.

Ajani Project
शिवसेनेच्या महापौर,उपमहापौर यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल

यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी अंजनी प्रकल्पातील जलसाठ्याचा उपयोग केवळ पाणी वितरण व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना होत नसल्याचे सांगितले. तसेच प्रकल्पातील जलसाठा नदीच्या पात्रातून आणि बंधाऱ्यातून केला जात असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात असल्याचे सांगितले.प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे,कालव्यांचे कामही पूर्ण झाले आहे मात्र वितरण व्यवस्था नसल्यामुळे शेतकरी सिंचनापासून वंचित राहत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पातील जलसाठ्याचा उपयोग सिंचनासाठी झाल्यास शेतकऱ्यांच्या जिवनात खऱ्या अर्थाने हरित क्रांती येण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

Ajani Project
पालच्या सुकी नदीत सापडले सहा कोटी वर्पांपूर्वीचे नैसर्गिक खांब

समितीच्या सदस्यांनी पाहणी केली

पद्मालय येथील साठवण बंधाऱ्याचे काम अनेक वर्षांपासून बंद असून बंधाऱ्यांच्या कामास गती मिळावी अशी मागणी केली. यावेळी अंदाज समितीचे अध्यक्ष रणजीत कांबळे आणि सदस्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची माहिती आणि पाणी वितरण व्यवस्थेबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी उपस्थित असलेल्या शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांनी अंजनी प्रकल्पाच्या वाढीव उंचीत बुडीत होणाऱ्या गावांचे पुनर्वसन करून प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा करावा अशी मागणी केली.

Ajani Project
नशिबाने मारले अन् देवाने तारले..महिलेची प्रवेशद्वारावरच प्रसूती

अंजनी प्रकल्पास भेट

अंदाज समितीचे अध्यक्ष रणजीत कांबळे,सदस्य आमदार संजय शिरसाठ,आमदार संजय गायकवाड,आमदार विनायक मेटे,आमदार चिमणराव पाटील,आमदार प्रकाश सोळंके,आमदार अमित झनक,आमदार विकास कुंभारे, आमदार कृष्णा खोपडे,आमदार विलास पोतनीस,आमदार वजाहत मिर्झा,आमदार निलय नाईक,आमदार बळवंत वानखेडे,आमदार भरतशेठ गोगावले यांनी पद्मालय येथील साठवण बंधारा आणि अंजनी प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com