
जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा पहिला रूग्ण आढळून येण्यास साडेपाच महिन्यांचा कालावधी झाला आहे. या साडेपाच महिन्यात जिल्ह्याची चिंता रोजच वाढत राहिली. सध्याच्या स्थितीला सर्वच खुले झाल्याने नागरीकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे आकडा देखील त्या पटीने वाढत आहे.
जळगाव : कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढताच आहे. जिल्ह्यातील बाधितांचा आकडा आता ४२ हजार ५५९ वर पोहचला असून, कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील कमी होत नाही. जिल्ह्यात आज दिवसभरात अठरा जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या १ हजार ६१ वर झाली आहे. हा वाढता आकडा चिंता वाढविणारा आहे.
जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा पहिला रूग्ण आढळून येण्यास साडेपाच महिन्यांचा कालावधी झाला आहे. या साडेपाच महिन्यात जिल्ह्याची चिंता रोजच वाढत राहिली. सध्याच्या स्थितीला सर्वच खुले झाल्याने नागरीकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे आकडा देखील त्या पटीने वाढत आहे. जिल्ह्यात बाधितांचा आकडा रोज सातशे- आठशेच्यावर येत आहे. यामुळे पाच हजार रूग्णांचा टप्पा गाठण्यास केवळ तीन- चार दिवस लागत आहेत. आज देखील जिल्ह्यात एकूण ७०३ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. अशा परिस्थितीमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४२ हजार ५५९ वर पोहचली असून यातील ३१ हजार ५०३ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
जळगावात सर्वाधित मृत्यू
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, यात जळगाव शहराची स्थिती अधिक बिकट आहे. कारण एकूण बाधितांमध्ये जळगाव शहरात ९ हजार ५१८ बाधित आढळून आले आहेत. तुलनेत मृत होणाऱ्यांची संख्या देखील जळगाव शहरात सर्वाधित आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात १८ जणांचा मृत्यू झाला असून, यात जळगाव शहर ४, भुसावळ ३, पाचोरा ३, चोपडा व बोदवड १ आणि एरंडोल, जामनेर व रावेर प्रत्येकी दोन जणांचे मृत्यू झाले आहेत. यामुळे एकूण मृतांची संख्या ही १ हजार ६१ झाली असून जळगाव शहरात २२० जणांचा मृत्यू झाले आहे.
असे आढळले रूग्ण
जळगाव शहर १०३, जळगाव ग्रामीण २५, भुसावळ ४९, अमळनेर ७०, चोपडा ९९, पाचोरा ३०, भडगाव २०, धरणगाव २७, यावल १४, एरंडोल ६५, जामनेर ९३, रावेर १५, पारोळा ८, चाळीसगाव २७, मुक्ताईनगर २२, बोदवड ३२ आणि इतर जिल्ह्यातील ४ रूग्णांचा समावेश आहे.