corona update दिलासादायक : बाधितांपेक्षा बरे झालेल्‍यांची संख्या अधिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus update

पाच दिवस मार्केटमधील दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आल्‍याने खुप मोठ्या प्रमाणात गर्दी होवू लागली आहे. कोरोना वाढण्यासाठी ही परिस्‍थिती गंभीर असली तरी आज (ता.३१) नवीन बाधितांचा आकडा ४५६ इतका आला आहे. त्‍या तुलनेत जास्‍त असून दिवसभरात ५२३ जण बरे झाले आहेत. यामुळे एक दिलासादायक चित्र पाहण्यास मिळू लागले आहे.

corona update दिलासादायक : बाधितांपेक्षा बरे झालेल्‍यांची संख्या अधिक

जळगाव : दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनामुळे जिल्‍ह्‍यातील स्‍थिती भयावह झाली आहे. जिल्‍ह्‍यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २७ हजाराच्या वर पोहचली असताना आता त्‍या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. जिल्‍ह्‍यासाठी दिलासादायक बाब म्‍हणजे आज दिवसभरात बाधित झालेल्‍यांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे
जिल्‍ह्‍यात कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. पंधरा दिवसांपुर्वी एक दिवसाआड मार्केट उघडण्यास परवानगी दिल्‍याने रूग्‍ण संख्येत देखील वाढ झाली होती. यातच आजपासून आठवड्यातील पाच दिवस मार्केटमधील दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आल्‍याने खुप मोठ्या प्रमाणात गर्दी होवू लागली आहे. कोरोना वाढण्यासाठी ही परिस्‍थिती गंभीर असली तरी आज (ता.३१) नवीन बाधितांचा आकडा ४५६ इतका आला आहे. त्‍या तुलनेत जास्‍त असून दिवसभरात ५२३ जण बरे झाले आहेत. यामुळे एक दिलासादायक चित्र पाहण्यास मिळू लागले आहे.

बरे होण्याचा आकडाही विस हजाराकडे
कोरोना व्हायरसची लागण झालेल्‍यांची संख्या जिल्‍ह्‍यात झपाट्याने वाढत राहिली. अवघ्‍या महिन्याभरात आकडा दहा हजाराने वाढला असून आजच्या ४५६ नवीन बाधितांमुळे एकूण बाधितांची संख्या ही २७ हजार ५९१ इतकी झाली आहे. त्‍याच तुलनेत आता बरे होण्याची संख्या देखील वाढून वीस हजाराकडे वाटचाल करत आहे. आजअखेरपर्यंत १९ हजार ७३६ इतका आकडा बरे झालेल्‍यांचा आहे. 

सात जणांचा मृत्‍यू
कोरोना संसर्गामुळे मृत्‍यू होण्याचा आकडा देखील अद्याप थांबलेला नाही. कोरोनामुळे मृत्‍यू होण्याचा रेशीओ कमी झाला असला तरी कोरोनामुळे रोजचे मृत्‍यू होत आहे. आज दिवसभरात सात जणांचा कोरोनाने मृत्‍यू झाला आहे. यामुळे जिल्‍ह्‍यातील एकूण मृतांची संख्या ८१३ वर पोहचली आहे.

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर १२९, जळगाव ग्रामीण ६, भुसावळ ५६, अमळनेर ३६, चोपडा ३०, पाचोरा ३, भडगाव ४७, धरणगाव २, यावल १०, एरंडोल १९, जामनेर ३१, रावेर २२, पारोळा ३१, चाळीसगाव २८, बोदवड २, इतर जिल्‍ह्‍यातील ४ जणांचा समावेश आहे.

Web Title: Marathi News Jalgaon Corona Virus Update New Positive Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaon
go to top