कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३० हजारांवर; नवे ९४८ रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

आज प्राप्त अहवालानुसार गेल्या २४ तासांत आणखी १६ रुग्ण दगावले असून एकूण बळींचा आकडा १०४३ वर पोचला आहे. आज मृत्युमुखी पडलेल्या १६ पैकी ४० वर्षीय युवकाव्यतिरिक्त अन्य सर्व रुग्ण ५० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आहेत.

जळगाव : एकीकडे रुग्णांची वाढती संख्या, मृत्यूचे सत्र सुरु असताना जिल्ह्यात बरे होणाऱ्यांच प्रमाणही वाढत आहे. दिवसभरात ८११ रुग्ण बरे झाल्यानंतर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा ३० हजारांवर पोचला आहे. सोबत नव्या ९४८ बाधितांसह एकूण रुग्णसंख्याही ४२ हजारांच्या टप्प्यात आहे. 
जळगाव जिल्हा पूर्णपणे हॉटस्पॉट बनला आहे. मुक्ताईनगर, बोदवड वगळता सर्व तालुक्यांमध्ये हजार, दोन हजारांहून अधिक रुग्ण आहेत. त्यात आज ९४८ रुग्णांची भर पडून एकूण संख्या ४१ हजार ८५६वर गेली असून बरे होणारे रुग्ण ३० हजार ७०२ एवढे आहेत. जिल्ह्यातील रुग्णांचे मृत्यूसत्र कायम आहे. आज प्राप्त अहवालानुसार गेल्या २४ तासांत आणखी १६ रुग्ण दगावले असून एकूण बळींचा आकडा १०४३ वर पोचला आहे. आज मृत्युमुखी पडलेल्या १६ पैकी ४० वर्षीय युवकाव्यतिरिक्त अन्य सर्व रुग्ण ५० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आहेत. 

जळगावात पाच जणांचा बळी 
जळगाव शहर सर्वाधिक प्रभावित झाले असून आजच्या नव्या २५२ रुग्णांसह शहरातील एकूण रुग्णसंख्या ९ हजार ४१५ झाली आहे. शहरात आतापर्यंत ६४६६ रुग्ण बरे झाले असून २१६ जणांचा मृत्यू झाला आहे. आज तब्बल पाच रुग्ण दगावले. त्यामुळे जळगाव शहराच्या चिंतेत भर पडली आहे. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर १५२, जळगाव ग्रामीण ५५, भुसावळ ८८, अमळनेर ७९, चोपडा ४७, पाचोरा ४३, भडगाव ११, धरणगाव ४६, यावल ५८, एरंडोल ३३, जामनेर ७३, रावेर १५, पारोळा १२, चाळीसगाव ९२, मुक्ताईनगर १६, बोदवड १३, अन्य जिल्ह्यातील १५. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus update news 948 patient