corona update नवे बाधित, बरे होणाऱ्यांच्या संख्येची स्पर्धा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

जळगावपाठोपाठ जळगाव ग्रामीण, चाळीसगाव आणि भुसावळ, अमळनेर आदी शहरांमध्येही दररोज रुग्ण वाढत आहेत. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस तेवढ्याच संख्येने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळत आहे

जळगाव : गेल्या तीन-चार दिवसांपासून नव्याने बाधित रुग्णांच्या बरोबरीने रुग्ण बरेही होत आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्यांचे वाढते प्रमाण ही समाधानाची बाब आहे. दिवसभरात जिल्ह्यात नवे ३६५ रुग्ण आढळून आले, तर ३६२ रुग्ण बरे होऊन घरीही गेले. एकूण रुग्णसंख्या ११ हजार ७५३वर पोचलेली असताना बरे होणाऱ्यांची संख्येनेही ८ हजारांचा टप्पा पार केला आहे. 
जळगाव जिल्ह्यात आज कोरोना बाधितांच्या नव्या संख्येने पुन्हा त्रिशतक गाठले. दिवसभरात जळगाव शहरातील ९२ या सर्वाधिक संख्येसह ३६५ रुग्ण आढळून आले. जळगावपाठोपाठ जळगाव ग्रामीण, चाळीसगाव आणि भुसावळ, अमळनेर आदी शहरांमध्येही दररोज रुग्ण वाढत आहेत. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस तेवढ्याच संख्येने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळत आहे. गेल्या दिवसभरात ३६२ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्यांची संख्या ८ हजार २०३ झाली आहे. आज सर्वाधिक ७७ रुग्ण जामनेरातून बरे झाले, तर जळगाव शहरातील ५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर ९२, जळगाव ग्रामीण २९, भुसावळ २८, अमळनेर २९, चोपडा ४५, पाचोरा ३०, भडगाव १५, यावल ७, धरणगाव ७, एरंडोल ४, जामनेर १६, रावेर १५, पारोळा ८, चाळीसगाव ३४, बोदवड ५. 
 
जळगावात ६ जणांचा मृत्यू 
जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येसह दररोज मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्याही कायम आहे. गेल्या २४ तासांत ३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकट्या जळगाव शहरातील ६ जणांचा समावेश आहे. दुर्दैवाने त्यात चौघा तरुणांचा समावेश आहे. एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या आता ५४० झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus new 365 positive patient