दिलासा..सलग तिसरा दिवस उजाळला विना मृत्यूचा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

जळगाव जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यानंतर नोव्हेंबर महिन्यातही कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. या महिन्यात आतापर्यंतच्या दहा दिवसांत एकदाही रुग्णसंख्येने तीनअंकी आकडा गाठलेला नाही.

जळगाव : जिल्ह्यात मंगळवारचा दिवसही दिलासादायक गेला. सलग तिसऱ्या दिवशी एकही मृत्यू झाला नाही. तर दिवसभरात केवळ ४० नवे रुग्ण आढळले, तर ७० रुग्ण बरे झाले. त्यामुळे बरे झालेल्यांचे प्रमाण ९७ टक्क्यांच्या जवळपास पोचले आहे. 
जळगाव जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यानंतर नोव्हेंबर महिन्यातही कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. या महिन्यात आतापर्यंतच्या दहा दिवसांत एकदाही रुग्णसंख्येने तीनअंकी आकडा गाठलेला नाही. सोमवारी अवघे १८ रुग्ण आढळल्यानंतर आज त्यात थोडी भर पडून ४० नवे बाधित आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५३ हजार ६२९ झाली आहे. तर दिवसभरात ७० रुग्ण बरे झाल्यानंतर बरे झालेल्यांचा एकूण आकडा ५१ हजार ८३० झाला आहे. रुग्णसंख्या घटत असल्याने ॲक्टिव रुग्णांची संख्या ५२७ एवढी मर्यादित राहिली असून त्यात ऑक्सिजनवरील ८२ तर आयसीयूमध्ये अवघे २६ रुग्ण आहेत. बरे झालेल्यांचे प्रमाणही ९६.६५ टक्के झाले आहे. 
 
जळगावला दिलासा 
जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटत असली तरी जळगाव शहरात दररोज रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी प्राप्त अहवालात मात्र जळगाव शहरात अवघे २ रुग्ण आढळून आले. भुसावळला ५, चोपड्याला २, जामनेरात १६, रावेरला २, पारोळ्यात १, बोदवडला ४ रुग्ण आढळून आले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus no death today