esakal | प्रवाशी मजुरामुळे जिल्ह्यात वाढला कोरोना
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus ratio spread

कोरोना संसर्ग पसरू नये, म्हणून लॉकडाऊनच्या काळात वाहतुकीची सर्व साधने शासनाने बंद केली होती. यामुळे अनेक परप्रांतीय कामगार मजूर मुंबईत अडकून पडले होते. लोकडाऊन असल्याने रोजगार नाही.

प्रवाशी मजुरामुळे जिल्ह्यात वाढला कोरोना

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव : जिल्ह्यात मे ते जून यात कोरोना बाधितांची संख्या वाढली होती. या काळात परराज्यात पाई जाणाऱ्यांची संख्या अधिक होती. सर्व प्रकारची वाहने बंद होती. यामुळे परप्रांतीय मजूर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात पायी जात होते, वाटेत त्यांना शासनासह सामाजिक कार्य करणारे पूजन निवासाची सोय करत होते. या सर्व प्रक्रियेतून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला मजुरांच्या लोंढ्यांना जागीच थांबवले असते; तर कोरोनाबाधीतांची संख्या कमी असती, असा दावा आरोग्य यंत्रणेतील तज्ञांनी केला आहे.

कोरोना संसर्ग पसरू नये, म्हणून लॉकडाऊनच्या काळात वाहतुकीची सर्व साधने शासनाने बंद केली होती. यामुळे अनेक परप्रांतीय कामगार मजूर मुंबईत अडकून पडले होते. लोकडाऊन असल्याने रोजगार नाही. किमान गावाकडे जाऊन काहीतरी मिळेल, किमान कुटुंबीयांजवळ आपण राहू शकू. कोरोना महामारित आपापल्या घरी राहिलेले बरे, अशी अनेकांची भावना होती.

मजुरांचा प्रभास महागात
बहुतांश परप्रांतीय कामगार मजूर पायीच मुंबईवरून निघाले होते. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील अनेक कामगारांचा त्यात समावेश होता. राष्ट्रीय महामार्गाने पायी निघालेले परप्रांतीय जळगाव जिल्ह्यातील पारोळा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, जळगावमार्गे भुसावळ, वरणगाव, मुक्ताईनगर किंवा रावेरमार्गे मध्य प्रदेशात गेले. वाटेत या बांधवांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था ठीकठिकाणी महसूल विभागातर्फे झाली. सामाजिक संघटनांनी स्थलांतरित करणाऱ्यांना भोजन, सॅनिटायझर, चहा- नाश्त्याची सोय केली. त्यांना तेथेच राहण्याचा सल्लाही देण्यात आला. मात्र मजुरांना घराची हास लागल्याने त्यांनी तेथून नजर चुकून आपल्या गावी जाण्यासाठी निघाले. मुंबईतून ते बाधित होऊन ज्या ठिकाणी थांबले नागरिकांच्या संपर्कात आले. त्यांना त्यांनी बाधित केले. यामुळेच जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या एप्रिल-मे, जूनमध्ये वाढली होती. जर स्थलांतरित एकाच ठिकाणी राहिले असते, तर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला नसता.

मध्य प्रदेशातील मजूर आले
याच काळात रावेर यावलमध्ये दोनशे ट्रक पिढी कापली गेली. त्यासाठी मध्य प्रदेशातील मजूर आले होते. त्या मजुरांनी ही जिल्ह्यातील काहींना बाधित केले. असावे यामुळेच बाधितांची संख्या वाढली. जर परराज्यातील मजूर नागरिकांच्या झुंडीच्या झुंडी जिल्ह्यात आल्या नसत्या, तर कदाचित कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात राहिली असती.

जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही. तोपर्यंत गर्दीत न जाणे, तोंडाला मास्क लावणे, सतत हात धुणे, याच उपाय योजना अजून काही महिने केल्यास पुरणाची दुसरी लाट येणार नाही. 
डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक

loading image