esakal | जळगावचा कोरोना विस्फोट पुणे- मुंबई इतका...आजचा आकडा रेकॉर्डब्रेक 
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. अवघ्या २० दिवसांत नवीन १० हजार रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २० हजार पार गेली.

जळगावचा कोरोना विस्फोट पुणे- मुंबई इतका...आजचा आकडा रेकॉर्डब्रेक 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गात शुक्रवारी मोठा विस्फोट समोर आला. प्राप्त अहवालांपैकी तब्बल ८७० नवे बाधित आढळून आले असून त्यात सर्वाधिक दोनशेपेक्षा अधिक रुग्ण जळगाव शहरात आढळून आले आहेत. वाढलेल्या या स्फोटक आकड्यांसोबतच दिवसभरात विक्रमी ५६६ रुग्ण बरे झाले असून गेल्या २४ तासांत १३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 
जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. अवघ्या २० दिवसांत नवीन १० हजार रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २० हजार पार गेली. त्यात शुक्रवारी एकाच दिवसांत ८७० रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णांचा आकडा २१ हजार ९७वर पोचला. बरे होणाऱ्यांचे प्रमाणही गेल्या काही दिवसांत बऱ्यापैकी वाढतेय. आज दिवसभरात ५६६ रुग्ण बरे झाल्यानंतर एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४ हजार ५४३ झाली आहे. दिवसभरात जळगाव शहरातील चौघांच्या मृत्यूसह १३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यामुळे बळींची संख्याही ७१३ झाली आहे. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर २२२, जळगाव ग्रामीण ७४, भुसावळ १०, अमळनेर ४४, चोपडा ८४, पाचोरा १४, भडगाव ४०, धरणगाव ७१, यावल २५, एरंडोल ५३, जामनेर ३७, रावेर ८६, पारोळा ३७, चाळीसगाव ६५, मुक्ताईनगर ३, बोदवड ५. 

गर्दी आणि चाचण्यांमध्येही वाढ 
गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी होत असून त्यामुळे संसर्ग वाढत असल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे आरटीपीसीआर व ॲन्टीजेन चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्ण समोर येत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातोय. दैनंदिन चाचण्यांमध्ये दिवसभरात आरटीपीसीआर १ हजार ०८ चाचण्यांपैकी २३५ पॉझिटिव्ह तर तर रॅपिड ॲन्टीजेनद्वारे ४ हजार २१६ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ६३५ पॉझिटिव्ह अहवाल आले. गेल्या काही दिवसांत चाचण्याही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे अधिक रुग्ण समोर येत आहेत. 

loading image
go to top