दिलासादायक; जळगाव रिकव्हरी रेट ८५ टक्‍क्‍यावर!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यातून ९०९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दिवसभरा ३०४ नवे रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे.

जळगाव : जिल्‍ह्‍यात वीस दिवसांपुर्वी कोरोना बाधितांचा रोजचा आकडा हजाराच्यावर निघत होता. कोविड सेंटरमध्ये उपचार घेतल्‍यानंतर बरे होवून घरी जात आहेत. यामुळे कोरोनामुक्‍त होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मागील पाच- सहा दिवसात जिल्‍ह्‍यातील रिकव्हरी रेट पाच- सहा टक्‍क्‍यांनी वाढून ८५.५० टक्‍क्‍यांपर्यंत आला आहे. 

जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यातून ९०९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दिवसभरा ३०४ नवे रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. अर्थात आजही आढळून आलेल्या रूग्णांपेक्षा बरे होणारे रूग्ण तीन पटीने असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. हे दिलासादायक चित्र आठवडाभरापासून पाहण्यास मिळत आहे. परंतु आजच्या अहवालात जळगाव शहरासह भुसावळ, अमळनेर तालुक्यात संसर्ग वाढल्याचे दिसून आले आहे. तर दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ११९० वर पोहचला आहे.

उपचार घेणाऱ्यांची संख्या घटली
आठवडाभरापासून बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्‍या तुलनेत नवीन बाधितांची आकडा कमी येत असल्‍याने एकूण बाधित आणि एकूण बरे होणाऱ्यांच्या संख्येतील तफावत कमी झाली आहे. आज ९०९ रूग्ण बरे झाले झाल्‍याने एकूण बरे होणाऱ्यांची संख्या ४१ हजार ४५४ इतकी झाली आहे. परिणामी सध्या स्‍थितीला उपचार घेत असलेल्‍या रूग्‍णांची संख्या देखील कमी झाली असून, सध्या स्‍थितीला ५ हजार ८४० इतकी झाली आहे.

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर ६७, जळगाव ग्रामीण ८, भुसावळ ३०, अमळनेर २८, चोपडा ५२, पाचोरा ६, भडगाव २, धरणगाव ५, यावल ६, एरंडोल ८, जामनेर २९, रावेर ९, पारोळा २, चाळीसगाव २९, मुक्ताईनगर ६, बोदवड ७ आणि इतर जिल्ह्यांमधील १० असे एकुण ३०४ रूग्ण आढळून आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus recovery rate 85 percentage