जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांवर 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.५६ टक्क्यांपर्यत पोहोचले आहे. जिल्ह्यात आज १८ नवीन रुग्णांचे निदान झाल्याची मा‍हिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. 

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची (ॲक्टीव्ह रुग्ण) संख्या ५७१ पर्यत खाली आली आहे. आज ६८ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ५१ हजार ७०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.५६ टक्क्यांपर्यत पोहोचले आहे. जिल्ह्यात आज १८ नवीन रुग्णांचे निदान झाल्याची मा‍हिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. 

मृत्‍यूदरही घसरला
आज एकूण ५७१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अवघी १९० इतकी आहे यातील २६ रुग्ण आयसीयुमध्ये असून ९४ रुग्णांना ऑक्सिजन वायु सुरु आहे. तर ३८१ रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १२७२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून सध्या जिल्ह्यातील मृत्यूदर २.३८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. 

१९८ अहवाल प्रलंबित
जिल्ह्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ लाख ९३ हजार ९६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५३ हजार ५५० (१८.२१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या १९८ अहवाल प्रलंबित आहे. सध्या जिल्ह्यात ३६९ व्यक्ती गृह अलगीकरणामध्ये आहेत तर १०७ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. इतर जिल्ह्यातील आतापर्यंत ४३२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आले. पैकी ४२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

जिल्ह्यात तालुकानिहाय रुग्ण संख्या अशी 
तालुका-- पॉझिटिव्ह-- बरे झालेले---मृत्यु-- सध्या उपचार घेत असलेले 
जळगाव शहर--१२०००-- २३५-- ११७२७ --२७२--२३६ 
जळगाव ग्रामीण--२५४४ --२४४२-- ८०-- २२ 
भुसावळ-- ४०००-३७३६--१५९-- १०५ 
अमळनेर--४४१५ --४२८२--१०३ --३० 
चोपडा--४३८३ --४२८२--७३ --२८ 
पाचोरा--१९४४--१८६५--७२-- ७ 
भडगाव --१९०१--१८४४--४२--१५ 
धरणगाव--२१८९--२१२८--५० --११ 
यावल--१७७३--१६९१--६२ --२० 
एरंडोल--२७९५--२७३२--४८ --१५ 
जामनेर--४१३०--४०३५--७३ --२२ 
रावेर--२२०८--२०९८--९९--११ 
पारोळा--२४९६ --२४६८ --१८--१० 
चाळीसगाव--३५३७ --३४५२--७५ --१० 
मुक्ताईनगर--१७३२--१६८८--३३ --११ 
बोदवड-- ८३६-- ८०९--१३ --१४ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus recovery rate 97 percentage