‘कोरोना’वर पहिली फिल्म येतेय; राज्यातही प्रसारित होणार

देविदास वाणी
Saturday, 14 November 2020

कोरोनावर मार्गदर्शनपर शॉट व्हिडिओ बनविण्यासाठी डॉ.चव्हाण यांनी डिरेक्टर पायल यांना प्रोत्साहित केले. तिनेही होकार देताच मुंबईवर टेक्नीकल आर्टीस्ट बोलावून घेतले.

जळगाव : कोरोना संसर्गाने जगच बदलवून टाकले. कोरोनो अद्याप गेलेला नाही. दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनापासून बचाव करायचा असेल तर ‘मास्क वापरा’, ‘सॅनटायझर वापरा’, सामाजीक अंतर ठेवा’ गर्दीत जावू नका’ असे जिल्हा प्रशासनाकडून सांगीतले जाते. मात्र किती जण त्याची अंमलबजावणी करतो. याच बाबत ‘आय.सी.ई. व्हिडीओ’ अंतर्गत दोन एकेका मिनीटांचे माहितीपर व्हिडिओ तयार करून नागरिकांना शिक्षित करण्यात आले आहे. हे माहितीपर शिक्षित करण्याचे व्हिडिओ बनविले आहेत जळगावच्या डिरेक्टर पायल चव्हाण यांनी. यातील कलावंतही जळगावचेच आहेत. 

‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ उपक्रमातंर्गत तयार करण्यात आलेल्या व्हिडिओतून लहान शाळेत मुले सामाजिक अंतर पाळू शकतात, जेवण करण्या आधी हात सॅनिटायझराज्ड करू शकतात. मग मोठ का नाही? आपणही ते करा व कोरोना पासून बचाव करण्याचा मोठा संदेश याद्वारे दिला आहे. हे दोन व्हिडिओ जळगाव जिल्ह्यातील सर्व चित्रपट गृहात दाखविले जाणार आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हे व्हिडिओ मुख्यमंत्र्यांना दाखवून राज्यभरातील सिनेमागृहात जनजागृतीपर दाखविण्यात येण्यासाठी विनंती करणार आहे. 

सारे कलावंत जळगावचे
व्हिडिओत काम करणारे कलावंत जळगावचे आहे. डीवायएसपी सुनील कुऱ्हाडे यांच्या पत्नी वैशाली कुऱ्हाडे यांनी ‘आईची’ तर मुकुंद गोसावी यांची मुलगी भैरवी गोसावी हिने लहान मुलीची भुमिका केली आहे. व्हीडीओला डिरेक्टशनचे काम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.सी.चव्हाण यांची मुलगी पायल चव्हाण यांनी केले आहे. पायल हिने बॅचरल ऑफ मास कम्यूनिकेशनचे शिक्षण घेतले. डिरेक्टर डिप्लोमामध्ये पोस्ट ग्रॅज्यूऐशन केले. मात्र परिक्षा झाल्यानंतर कोरोना सुरू झाला. नंतर ती घरीच होती. 

डॉ. चव्हाणांनी केले प्रोत्‍साहित 
कोरोनावर मार्गदर्शनपर शॉट व्हिडिओ बनविण्यासाठी डॉ.चव्हाण यांनी डिरेक्टर पायल यांना प्रोत्साहित केले. तिनेही होकार देताच मुंबईवर टेक्नीकल आर्टीस्ट बोलावून घेतले. कलावंत जळगावचेच निवडले. शुटींगही जळगावला केले. जळगावचेच डिरेक्टर, कलावंत असलेली हे शार्ट व्हिडीओ सर्वांच्या पसंतीस उतरले आहेत. या शॉट फिल्ममध्ये कॅमेरामन शुभम देरे, व्हीडीओ एडीटर सिध्दकांत कदम, निमिर्ती आयुषी भालोटीया, सहाय्यक दिग्दर्शक ओंकार देशपांडे आहे. 

कोरोनावर आधारीत शार्ट व्हीडीओ पहिल्यांदा मी बनविला. कलावंत जळगावचे आहेत, शुटींगही जळगावला केले. माझे वडील डॉ.एन.सी.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने हे दोन शार्ट व्हिडिओ बनविले. याद्वारे कोरोना बाबत जनजागृती होईल. 

- पायल चव्हाण, डायरेक्‍टर 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus short film create jalgaon actor and director