esakal | दिपोत्‍सवात कोरोनाकडे दुर्लक्ष; तपासणी करण्याकडे पाठ 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत आहे. ऐन दिवाळीत नागरिकांनी तपासण्यांकडेही पाठ फिरवली असून चाचण्या कमी होऊ लागल्या आहेत. रविवारी केवळ सातशे अहवाल प्राप्त झाले व सुमारे तेवढेच तपासणीसाठी पाठविण्यात आले.

दिपोत्‍सवात कोरोनाकडे दुर्लक्ष; तपासणी करण्याकडे पाठ 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : दिवाळीचा कोरोनच्या तपासण्यांवरही परिणाम झाला असून रविवारी प्राप्त अवघ्या सातशे तपासणी अहवालात अवघे २१ नवे बाधित आढळून आले. दररोज कमी होणाऱ्या रुग्णांमुळे ॲक्टिव रुग्ण चारशेच्या आत आले असून जळगाव शहरात एकमेव रुग्ण आढळून आला. 
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत आहे. ऐन दिवाळीत नागरिकांनी तपासण्यांकडेही पाठ फिरवली असून चाचण्या कमी होऊ लागल्या आहेत. रविवारी केवळ सातशे अहवाल प्राप्त झाले व सुमारे तेवढेच तपासणीसाठी पाठविण्यात आले. प्राप्त अहवालात २१ नवे बाधित आढळून आले. तर दिवसभरात दोघांच्या मृत्यूसह ३२ जण बरेही झाले. दररोज कमी होणाऱ्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची संख्याही घटली आहे. प्रथमच ॲक्टिव रुग्ण चारशेच्या आत म्हणजे ३९७ आहेत. पैकी २७२ लक्षणे नसलेले व १२५ लक्षणे असलेले रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्या ५३ हजार ७७८ झाली असून रिकव्हरी रेट ९६.८९ टक्के आहे. गेल्या २४ तासांत दोघांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या १२७७ झाली आहे. 

असे आढळले रूग्‍ण
रविवारी प्राप्त अहवालानुसार जळगाव शहरात अवघे २ रुग्ण आढळून आले. भुसावळला ५, यावल येथे ११, रावेर, पारोळा येथे प्रत्येकी १, मुक्ताईनगरला २ रुग्ण आढळले.