esakal | दिलासा..कोरोना संसर्गाचा आकडा घटला
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus update

दिवाळीनंतर सर्वत्र कोरोनाचा प्रसार वाढत असल्‍याने दुसरी लाट आल्‍याचे बोलले जात आहे. जिल्‍ह्‍यात देखील ही स्‍थिती काहीशी पाहण्यास मिळत असून सध्या तरी आकडा झपाट्याने वाढत नसल्‍याचे चित्र आहे.

दिलासा..कोरोना संसर्गाचा आकडा घटला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोना व्हायरसचा प्रसार पुन्हा एकदा वाढण्यास सुरवात झाली आहे. मात्र जिल्‍ह्‍यासाठी गेल्‍या दोन दिवसांच्या तुलनेत रूग्‍ण संख्या कमी झाल्‍याने काहीसा दिलासादायक चित्र आजचे राहिले. जिल्ह्यात दिवसभरात ४५ रूग्ण आढळून आले; तर ४३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
दिवाळीनंतर सर्वत्र कोरोनाचा प्रसार वाढत असल्‍याने दुसरी लाट आल्‍याचे बोलले जात आहे. जिल्‍ह्‍यात देखील ही स्‍थिती काहीशी पाहण्यास मिळत असून सध्या तरी आकडा झपाट्याने वाढत नसल्‍याचे चित्र आहे. तरी देखील नागरीकांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असून, त्‍याकरीता मास्‍क वापर न करणाऱ्यांवर दंडात्‍मक कारवाई करण्यात येत आहे.

५६४ उपचार घेणारे
जिल्‍ह्‍यातील कोरोना संसर्गाचा प्रसार सुरूच आहे. जिल्‍ह्‍यात आज दिवसभरात ४५ नवे रूग्‍ण आढळून आल्‍याने जिल्ह्यातील एकुण बाधितांचा आकडा ५४ हजार ५०२ वर पोहचला आहे. यातील ५२ हजार ६४२ रूग्ण बरे होवून घरी परतले असून सद्यस्‍थितीला ५६४ रूग्ण उपचार घेत आहे. मात्र मृत्‍यूचा आकडा थांबत नसून आज देखील ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाल्‍याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर १४, जळगाव ग्रामीण १, भुसावळ ११, अमळनेर ३, चोपडा ३, बोदवड १, धरणगाव १, एरंडोल १, यावल ३, रावेर १,चाळीसगाव २, मुक्ताईनगर ३, इतर जिल्हा १ असे ४५ रुग्ण आढळले आहे. तर पाचोरा, भडगाव, जामनेर, पारोळा या पाच तालुक्यात रूग्ण आढळून आले नाही. 

loading image