esakal | कोरोनाचा मोठा दिलासा..ॲक्टिव रुग्णांची संख्या हजाराच्या आत 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus update

जळगाव जिल्ह्यात दीड महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने ओसरतोय. रुग्णांचा आलेख खाली येत असून दररोज नवे बाधित कमी, बरे होणारे अधिक अशी सातत्यपूर्ण नोंद आहे.

कोरोनाचा मोठा दिलासा..ॲक्टिव रुग्णांची संख्या हजाराच्या आत 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोना संसर्गाच्या बाबतीत जिल्ह्याला दिलासा देणारी आणखी एक बाब घडली. आज ॲक्टिव रुग्णांचा आकडा हजाराच्या खाली येऊन तो ९७८वर स्थिरावला. नव्याने ६३ रुग्ण आढळून आले तर दिवसभरात १२३ बरे झाले. आणखी दोघा रुग्णांचा गेल्या २४ तासांत बळी गेला. 
जळगाव जिल्ह्यात दीड महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने ओसरतोय. रुग्णांचा आलेख खाली येत असून दररोज नवे बाधित कमी, बरे होणारे अधिक अशी सातत्यपूर्ण नोंद आहे. गुरुवारी प्राप्त दोन हजारांवर अहवालात ६३ नवे रुग्ण आढळून आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५३ हजार ९६ झाली आहे. तर १२३ रुग्ण बरे झाल्यामुळे बरे झालेल्यांचा आकडाही ५० हजार ८५७वर पोचला आहे. दोघांच्या मृत्युमुळे एकूण बळींची संख्या १२६१ झाली असून जिल्ह्याचा रिकव्हरी रेट आता ९६ टक्क्यांच्या घरात पोचत आहे. 

जळगाव शहरात संसर्ग सुरुच 
एकीकडे जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असताना जळगाव शहरातही रुग्ण घटत असले तरी संसर्ग मात्र सुरुच आहे. शहरातील रोजच्या आढळून येणाऱ्या संख्येने एकअंकी आकडा अद्याप गाठला नाही. गुरुवारीही शहरात २७ नवे बाधित आढळले. मात्र, दिवसभरात ७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. अन्य ठिकाणी असे आढळले रुग्ण : जळगाव ग्रामीण ३, भुसावळ ११, अमळनेर १, चोपडा १, पाचोरा १, भडगाव ४, यावल १, जामनेर ३, चाळीसगाव ७, रावेर १, बोदवड ३. 
 

loading image