
जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आजही बरे होणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या पुन्हा जास्त आढळून आली आहे. जिल्ह्यात आज ७४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत.
जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होत चालली आहे. नवीन कोरोना बाधितांचा आकडा सध्या कमी दिसत असला तरी जिल्ह्यात कोरोना हळूहळू वाढण्यास सुरवात झाली आहे. शिवाय, कोरोनामुळे होणारे मृत्यू देखील अद्याप थांबलेले नाही.
जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आजही बरे होणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या पुन्हा जास्त आढळून आली आहे. जिल्ह्यात आज ७४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर ४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकुण बाधितांची संख्या ५४ हजार ४५७ पर्यंत पोहचली असून ५२ हजार ५९९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एका रुग्णाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १ हजार २९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. तर ५६५ रुग्ण सध्या उपचार घेताय.
जळगाव, भुसावळ चिंताजनक
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढत असून, यात जळगाव आणि भुसावळची स्थिती अधिक चिंताजनक आहे. कारण जिल्ह्यात आढळून येत असलेल्या एकूण कोरोना बाधितांमध्ये जळगाव आणि भुसावळमध्ये सर्वाधिक रूग्ण आढळून येत आहेत. आज देखील जळगाव शहरात १७ आणि भुसावळमध्ये १४ नवीन रूग्ण आढळून आले आहेत.
असे आढळले रूग्ण
जळगाव शहर १७, जळगाव ग्रामीण ०२, भुसावळ १४, अमळनेर ०८, पाचोरा ०१, भडगाव ०३, यावल ०७, जामनेर ०३, रावेर ०५, पारोळा ०२, चाळीसगाव ०८, मुक्ताईनगर ०१, इतर जिल्ह्यातील ०३ असे एकुण ७४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर चोपडा, धरणगाव, एरंडोल आणि बोदवड तालुक्यात एक देखील रूग्ण आढळून आला नाही.