दिवसभरातील बाधितांचा आकडा पन्नाशीच्या खाली

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

जिल्ह्यातील कोरोनाची घटती संख्या दिलासा देत आहे. आतापर्यंत बाधित आणि बरे होवून घरी गेलेल्‍यांची रूग्‍ण संख्या पन्नास हजाराच्या वर पोहचली आहे. हा आकडा मोठा दिसत असला तरी महिनाभरापासून जिल्‍ह्‍यात दिलासादायक चित्र अनुभवण्यास मिळत आहे.

जळगाव : जिल्‍ह्‍यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याचे चित्र आहे. यात आज दिवसभरात अवघे ४४ नवीन बाधित रूग्ण आढळून आले. तर जिल्ह्यातून आज ९५ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाची घटती संख्या दिलासा देत आहे. आतापर्यंत बाधित आणि बरे होवून घरी गेलेल्‍यांची रूग्‍ण संख्या पन्नास हजाराच्या वर पोहचली आहे. हा आकडा मोठा दिसत असला तरी महिनाभरापासून जिल्‍ह्‍यात दिलासादायक चित्र अनुभवण्यास मिळत आहे. उत्‍सवाच्या पार्श्वभुमीवर मार्केटमध्ये खरेदी करणाऱ्यांची गर्दी वाढली असल्‍याने रूग्‍ण वाढण्याची भिती होती. परंतु, चित्र उलटे झाले असून, रूग्‍ण संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तरी देखील गाफिल राहून चालणार नाही. जगात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली असल्‍याने काळजी घेणे महत्‍त्‍वाचे ठरणार आहे.

दोघांचा मृत्‍यू
जिल्‍ह्‍यात आज दिवसभरात एकुण ४४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची संख्या एकुण ५३ हजार १९३ पर्यंत पोहचली असून ५० हजार ८६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या मृत्‍यूमुळे आतापर्यंत १ हजार २६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. तर ८४० रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर १३, जळगाव ग्रामीण- २, भुसावळ १२, चोपडा १, भडगाव ४, यावल ५, एरंडोल १, रावेर ३, पारोळा १, चाळीसगाव १, मुक्ताईनगर १.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus update new patient figer low