
जळगाव जिल्ह्यात दोन महिन्यांपासून नियंत्रणात येत असलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. तीन-चार दिवसांपासून बरे होणारे कमी व नवे बाधित जास्त अशी स्थिती आजही कायम होती.
जळगाव : दिवाळीनंतर अपेक्षेप्रमाणे कोरोनाचा संसर्ग वाढत असून नव्या बाधितांची संख्या बरे होणाऱ्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात ॲक्टिव रुग्णांसोबतच गंभीर रुग्णसंख्याही वाढत चालली आहे. शिवाय, गेल्या २४ तासांत ३ रुग्णांच्या मृत्यूने आरोग्य यंत्रणेची चिंता पुन्हा वाढवली आहे.
जळगाव जिल्ह्यात दोन महिन्यांपासून नियंत्रणात येत असलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. तीन-चार दिवसांपासून बरे होणारे कमी व नवे बाधित जास्त अशी स्थिती आजही कायम होती. दिवसभरात ६५ नवे रुग्ण सापडल्याने एकूण आकडा ५४ हजार १७७ झाला आहे. तर ३९ रुग्ण बरे झाल्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ५२ हजार ४४७वर पोचली आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांच्या टप्प्यात आहे.
ॲक्टीव रूग्ण वाढू लागले
आज प्राप्त नोंदीनुसार तीन रुग्णांच्या मृत्युमुळे एकूण बळींची संख्या १२८९ झाली आहे. आज भडगाव, धरणगाव, एरंडोल, बोदवड हे चार तालुके वगळता प्रत्येक तालुक्यात रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे आता ॲक्टीव रुग्णही वाढत असून तो आकडा ४४१ वर तर ऑक्सिजन व आयसीयूतील गंभीर रुग्णांची संख्याही १४० झाली आहे.
असे आढळले रुग्ण
जळगाव शडर १७, जळगाव ग्रामीण ४, भुसावळ ११, अमळनेर १, चोपडा ५, पाचोरा १, यावल २, जामनेर २, रावेर ६, पारोळा २, चाळीसगाव ३, मुक्ताईनगर १०, अन्य जिल्ह्यातील १.