कोरोनाचे रूग्‍ण घटते; पण मृत्‍यू काही थांबेना

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे. ऑगस्ट, सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात सात-आठशे, हजारांच्या वर दररोज नवे रुग्ण आढळून येत होते. ती संख्या १७ सप्टेंबरपासून सातत्याने कमी होत आहे.

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आलेख उतरताच आहे. महिनाभरापासून सातत्याने नव्या बाधितांची संख्या बरे होणाऱ्यांपेक्षा कमी येत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. गुरुवारी प्राप्त अहवालात नव्याने ११९ रुग्ण आढळून आले, तर बरे झालेल्यांची संख्या २५५ आहे. दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला. 
जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे. ऑगस्ट, सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात सात-आठशे, हजारांच्या वर दररोज नवे रुग्ण आढळून येत होते. ती संख्या १७ सप्टेंबरपासून सातत्याने कमी होत आहे. सध्या रोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या शंभर- दोनशेच्या घरात, काही दिवस तर शंभराच्या आत नोंदली गेली. गुरुवारी ११९ नवे बाधित आढळल्यानंतर एकूण रुग्णसंख्या ५१ हजार ५६९ झाली आहे. तर २५५ बरे झालेल्यांसह एकूण बरे होणारे रुग्ण ४८ हजार ११७ आहेत. गेल्या २४ तासांत दोन रुग्णांचा बळी गेला, त्यामुळे एकूण बळींचा आकडा १२३५वर पोचला. 

जळगाव शहराला दिलासा 
जळगाव शहरात आज नव्याने ४१ रुग्ण आढळून आले. दिवसभरात एकही रुग्ण दगावला नाही, व ९१ रुग्ण बरे झाले. सध्या शहरात केवळ अकराशे रुग्ण ॲक्टिव आहेत. अन्य ठिकाणी असे आढळले रुग्ण : जळगाव ग्रामीण २, भुसावळ ६, अमळनेर ४, चोपडा ३, पाचोरा ६, भडगाव ७, धरणगाव ३, यावल १७, जामनेर ७, रावेर ५, चाळीसगाव १४, मुक्ताईनगर २, बोदवड १. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus update positive case ration down