जिल्ह्याचा रिकव्हरी रेट पोचला ९५ टक्‍के; नवे ८७ बाधित

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

जळगाव जिल्ह्यात दीड महिन्यापासून कोरोनाचा आलेख घटत आहे. बरे होणारे अधिक, नवे बाधित कमी अशी स्थिती दररोज आढळून येत असून त्यामुळे ॲक्टिव रुग्णही हजारापर्यंत मर्यादित राहिले आहेत.

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. दररोजच्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त असण्याची मालिका दीड महिन्यापासून सुरु असून आजही कायम होती. आज प्राप्त अहवालात १८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८७ नवे बाधित आढळून आले. जिल्ह्यात बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९५ टक्क्यांवर पोचले आहे. 
जळगाव जिल्ह्यात दीड महिन्यापासून कोरोनाचा आलेख घटत आहे. बरे होणारे अधिक, नवे बाधित कमी अशी स्थिती दररोज आढळून येत असून त्यामुळे ॲक्टिव रुग्णही हजारापर्यंत मर्यादित राहिले आहेत. आज प्राप्त दोन हजारांवर अहवालात ८७ नवे बाधित आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा ५२ हजार ९४९ झाला. तर १८३ जण कोरोनामुक्त झाल्यने बरे झालेल्यांची संख्या ५० हजार ५९१ झाली आहे. बरे झालेल्यांचे प्रमाण तब्बल ९५.५५ टक्के आहे. दिवसभरातील एकमेव बळीने एकूण मृत्यू १२५९ झाले आहेत. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर २५, जळगाव ग्रामीण ५, भुसावळ १३, अमळनेर १४, चोपडा १, पाचोरा २, धरणगाव ३, भडगाव १, यावल १, एरंडोल १, जामनेर १, रावेर १७, मुक्ताईनगर १, बोदवड २. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus update recovery ratio up last month