
जिल्ह्यातील कोरोना व्हायरस कमी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत असले तरी देखील गाफील राहून चालणार नाही. गर्दीच्या ठिकाणी तोंडाला मास्क लावून राहणे हिच आपली सुरक्षा ठरणार आहे.
जळगाव : जिल्ह्यातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव निश्चितच कमी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. मागील दोन महिन्यांपासून बाधितांची संख्या कमी झाली असून आज जिल्ह्यात केवळ ३४ नवीन रूग्ण आढळून आले. यातील अमळनेर तालुक्यात सर्वाधिक बारा रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील कोरोना व्हायरस कमी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत असले तरी देखील गाफील राहून चालणार नाही. गर्दीच्या ठिकाणी तोंडाला मास्क लावून राहणे हिच आपली सुरक्षा ठरणार आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. दिवाळीनंतर संख्या वाढणार असे बोलले जात होते. मात्र त्या तुलनेत जिल्ह्यातील बाधितांची रोजची संख्या ही शंभरच्या आत येत आहे. यामुळे जिल्ह्यासाठी हे दिलासादायक चित्र म्हणावे लागणार आहे.
४२७ ॲक्टीव्ह रूग्ण
जिल्ह्यात आज दिवसभरात एकूण ३४ जणांना बाधा झाल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. यामुळे एकूण बाधितांची संख्या ५४ हजार ८७२ वर पोहचली आहे. तर दुसरीकडे ५७ रूग्ण बरे होवून घरी परतले असून आतापर्यंत बरे झाल्यांची संख्या ५३ हजार १३९ वर पोहचली आहे. तरी देखील सद्यस्थितीला जिल्ह्यात ४२७ ॲक्टिव्ह रूग्ण असून १४६ जणांना लक्षण आहेत; तर २८१ रूग्णांमध्ये लक्षण नाही. तसेच आजच्या एका मृत्यूमुळे जिल्ह्यात १ हजार ३०१ मृत्यू कोरोनामुळे झाले आहे.
असे आढळले रूग्ण
जळगाव शहर ३, भुसावळ ४, अमळनेर १२, पाचोरा १, धरणगाव १, यावल १, जामनेर १, रावेर ५, चाळीसगाव ५ आणि इतर जिल्ह्यातील एक रूग्णाचा समावेश आहे. तर उर्वरीत तालुक्यांमध्ये एक देखील रूग्ण आढळून आला नाही.