
जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरपासून कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असताना बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.
जळगाव : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आलेख लक्षणीयरीत्या खाली येत असून, हजारावर पोचलेली ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्याही कमी होऊन दोनशेच्या टप्प्यात आली आहे. गेल्या दिवसभरात नवे १२८ रुग्ण आढळले, तर २३८ बरे झाले.
जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरपासून कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असताना बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार दिवसभरात नव्याने बाधित १२८ रुग्णांसह एकूण रुग्णसंख्या ५१ हजार ६९७ वर पोचली आहे. २३८ बरे झालेल्या रुग्णांसह एकूण बरे झालेल्यांचा आकडा ४८ हजार ३५५ झाला आहे. रिकव्हरीचे हे प्रमाण तब्बल ९३.५४ टक्के आहे. गेल्या २४ तासांत दोनच रुग्णांचा मृत्यू झाला, ही बाबही दिलासादायक आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यातील एक हजार २३७ रुग्णांना प्राण गमवावे लागले.
असे आढळले रुग्ण
जळगाव शहर २४, जळगाव ग्रामीण १, भुसावळ १८, अमळनेर २२, चोपडा १, पाचोरा ६, भडगाव ३, धरणगाव ३, यावल ९, जामनेर ६, रावेर २, चाळीसगाव २१, मुक्ताईनगर २, बोदवड ६, अन्य जिल्ह्यांतील २.
अशी आहे आकडेवारी
एकूण रुग्ण : ५१,६९७
बरे झालेले : ४८,३५५
सध्या ॲक्टिव : २,१०५
ऑक्सिजनवरील : २३१
आयसीयूतील रुग्ण : १०१