पथविक्रेत्यांसाठी आत्मनिर्भर योजना...काय आहे यात पहा 

देविदास वाणी
रविवार, 2 ऑगस्ट 2020

पथविक्रेत्यांनी नियमित परतफेड केल्यास, १ वर्षाच्या आत परतफेडीची हमी दिल्यास त्यांना ७ टक्के व्याज अनुदान मिळेल. या कर्जावर आरबीआयचया प्रचलित दरानुसार व्याजदर असेल.

जळगाव : महापालिका क्षेत्रातील पथविक्रेत्यांना लॉकडाउनच्या काळात आत्मनिर्भर बनविण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना राबविण्यात येत असल्याची माहिती आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली. या योजने अंतर्गत पथविक्रेत्याना दहा हजारांपर्यंत कर्ज भांडवल स्वरूपात मिळेल. 
 

हेही पहा : पायात वायर अडकली...तोल जावून पाण्यात पडला अन्‌ क्षणात संपले जीवन
 

कोरोना संसर्गामुळे पथविक्रेत्यांना खेळते भागभांडवलाचा प्रश्‍न सतावतो आहे. यामुळे जळगाव महापालिकेने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ही सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना शहरात सुरू केली आहे. यात पथविक्रेते, फेरीवाला, ठेलेवाला, रेहरीवाला, ठेलीफडवाला हे सहभागी होऊ शकतात. भाज्या, फळे, तयार खाद्य पदार्थ, चहा, भजी, पाव, अंडी, कापड वस्त्र, चप्पल, कारागिराद्वारे उत्पादित वस्तू, पुस्तके, स्टेशनरी, पान दुकान, कपडे धुण्याचे दुकान आदींचा समावेश आहे. या योजने अंतर्गत पथविक्रेत्यांनी डिजिटल व्यवहारास प्राधान्य दिल्यास त्यांना कॅशबॅक मिळविता येईल. 

‘सीएससी’ सेंटरवरून अर्ज करा.. 
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या लाभासाठी हॉकर्स, पथविक्रेत्यांनी शहरातील ग्राहक सेवा केंद्र (सीएससी सेंटर) मध्ये जाऊन http:/pmsvanidhi.mohua.gov.in या लिंकवर अर्ज भरावा. त्याअगोदर अतिक्रमण विभागाकडून विक्री प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporation aria hokers aatmnirbhar scheme