जळगाव मनपाच्‍या प्रवेशद्वारावर मृतदेह; कर्मचारी होता बडतर्फ

भुषण श्रीखंडे
Thursday, 29 October 2020

महापालिकेच्या दुर्लक्ष कारभारामुळे त्यांच्या मृत्यू झाल्याचा संताप नातेवाईंनी करत त्यांचा मृतदेह महापालिकेच्या आवारात आणत ठिय्या आंदोलन केले. मुलाला अनुकंपात लावण्याचे आश्‍वासन दिले जात नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचा पवित्रा नातेवाईंकांनी घेतला होता.

जळगाव : जळगाव शहर महानगर पालिकेतील तीन वर्षापूर्वी झालेल्या बडतर्फे कारवाईत बांधकाम विभागातील कर्मचारी विष्णू चावदस बागडे (वय ५२) हे बडतर्फे झाले होते. पाठपुरावा करून देखील कामावर घेतले जात नसल्याच्या ते तणावात होते. तणावामुळे त्यांचा हृदयविकाराने आज दुपारी निधन झाले. महापालिकेच्या दुर्लक्ष कारभारामुळे त्यांच्या मृत्यू झाल्याचा संताप नातेवाईंनी करत त्यांचा मृतदेह महापालिकेच्या आवारात आणत ठिय्या आंदोलन केले. मुलाला अनुकंपात लावण्याचे आश्‍वासन दिले जात नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचा पवित्रा नातेवाईंकांनी घेतला होता. 

जळगाव महापालिकेत तीन वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर असतांना सह्याजीराव तसेच वेळेत कामावर आले नसलेल्या सुमारे ८० कर्मचाऱ्यांवर बडतर्फ करण्याची कारवाई केली होती. त्यानतंर तत्‍कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी तीस बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतले होते. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करून सुध्दा सेवेत घेण्याची प्रक्रिया महापालिका घेत नसल्याने अनेक कर्मचारी न्यायालयात गेले होते. त्यात विष्णू चावदस बागडे हे देखील न्यायालयात गेले होते. 

तणावात होते बागडे
वारंवार पाठपुरावा करून सुध्दा त्यांना कामावर हजर केले जात नसल्याने बागडे हे तीन वर्षापासून तणावात होते. त्यामुळे त्यांची प्रकृती खालवली होती. त्यात आज दुपारी हदविकाराचा झटका येवून त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईंकांनी महापालिका प्रशासनावर संताप व्यक्त करत बागडे यांचा मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता थेट महापालिकेच्या आवारात आणत ठिय्या आंदोलन केले. 

मुलाला अनुकंपावर घेण्याची मागणी
महापालिकेच्या भोंगळ कारभारचा निषेध करत मृत बागडेंच्या मुलाला त्याच्या जागी अनुकंपात नोकरीत समावेश करून घेण्याची मागणी केली. याबाबत आयुक्त सतिश कुलकर्णी यांची नातेवाईंकांनी भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी म्हणाले, की बडतर्फे कर्मचाऱयांचा न्यायालयात केस सुरू आहे. याबाबत न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील. त्यानुसार पुढील प्रक्रिया करू असे आश्‍वासन मृत बागडे यांचा नातेवाईंकांना आयुाक्तांनी दिले. त्यानंतर नातेवाईकांनी बागडेंचा मृतदेह महापालिकेतून नेऊन अंत्यसंस्कार केले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporation door death body relative