दोन्ही रूग्‍णालय मनपाचेच अहवाल मात्र वेगळे; म्‍हणून तो झाला बिनधास्‍त अन्‌ घडला हा प्रकार

corona
corona

जळगाव : शहरातील शिवाजीनगर येथील सत्तावीस वर्षीय तरुणाने ताप, खोकल्याचे लक्षण जाणवत असल्याने मनपाच्या डी.बी.जैन रुग्णालयात कोरोनाची अँटीजन टेस्ट केली होती. ती, पॉझिटिव्ह आल्यावर या तरुणाला शंका आल्याने त्याने लगेच तासाभरात मनपाच्या शाहु रुग्णालयात जाऊन स्वॉब देत तपासणी केली तर, येथे अहवाल निगेटिव्ह आला होता. दोन्ही रिपेार्टसह प्रसार माध्यमात वृत्त झळकल्यानंतर, मनपा प्रशासनाने या प्रकरणात दखल घेत योगेश संजय कदम (वय २७) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डी. बी. जैन मनपा रुग्णालयाच्या परिचारिका सुनिता विजय गुरचळ यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, ८ सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता रुग्णालयात कोरोनाची अँन्टीजन तपासण्या सुरू होत्या. यावेळेस शिवाजीनगरातील रहिवासी योगेश संजय कदम (वय २७) याची तपासणी केल्यावर अहवाल कोव्हीड पॉझिटिव्ह आला होता. त्याला अभियांत्रिकी महाविद्यालयात दाखल करण्याचा निर्णय होऊन डॉक्टर व परिचारिकांनी योगेशला तत्काळ उपचारार्थ दाखल होण्याची समज दिली. मात्र, तो तेथून न सांगता निघून गेला. तासाभरात त्याने महापालिकेच्याच छत्रपती शाहु रुग्णालय गाठून येथे तपासणी करून घेतली. तेथील तपासणी अहवाल निगेटिव्ह असल्याचा अहवाल आला होता. रुग्णालयातून त्यास वारंवार फोन येत असल्याने त्याने माझा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे सांगत उपचारार्थ रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. नगरसेवक कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे यांनी विनवण्या केल्यावर तो, दुसऱ्या दिवशी (ता.९) रुग्णालयात दाखल झाला होता. 

आज गुन्हा दाखल 
महापालिका आयुक्तांच्या आदेशान्वये परिचारिका यांनी शहर पेालिस ठाण्यात येऊन तक्रार दिली असून, शासकीय आदेशाचे उल्लंघन करून कोव्हीड-१९ रोगाचा प्रार्दुभाव व प्रसार करून मुद्दाम लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी हयगयीची कृती केल्याबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास पोलिस नाईक अक्रम शेख तपास करीत आहेत. 

दोन्ही रिपेार्ट व्हायरल 
एकाच दिवशी मनपाच्या देान वेगवेगळ्या रुग्णालयात केलेल्या तपासण्यांचा अहवाल एक निगेटिव्ह, दुसरा पॉझिटिव्ह आल्याने..रिपेार्टसहित सोशल मिडीयावर खिल्ली उडवणाऱ्या पोस्ट करण्यात येत होत्या. व्हायरल पेास्टमुळे जिल्‍हा प्राशनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com