esakal | जळगाव मनपात सत्‍तांतर; पण भाजप- शिवसेनेचे शाब्‍दीक वार

बोलून बातमी शोधा

jalgaon corporation

जळगाव मनपात सत्‍तांतर; पण भाजप- शिवसेनेचे शाब्‍दीक वार

sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : जळगाव महापालिकेत (jalgaon corporation) राज्याची पुनरावृत्ती झाली. भाजपकडे (bjp) बहुमत असतानाही विरोधी शिवसेनेने (shiv sena) नगरसेवक फोडून सत्ता मिळवली. यानंतर मात्र भाजप आक्रमक झाली आहे. त्यामुळे शिवसेना भाजप यांच्यात घमासान सुरू आहे. (jalgaon corporation shiv sena and bjp political wor)

शिवसेनेची सत्ता आल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ६० कोटींचा निधी महापालिकेस मंजूर करून दिला. यावेळी त्यांनी माजी पालकमंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. महाजन यांनी जळगावची वाट लावली असा आरोप त्यांनी केला आणि त्यानंतर जोरदार राजकीय घमासान सुरू झाले आहे. भाजपनेही पत्रकार परिषद घेऊन गुलाबराव पाटील यांच्यावर नाचता येईना अंगण वाकडे म्हणत टीका केली, तर त्याला शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी भाजप तमासगीर या शब्दात टोला लगावला आहे.

हेही वाचा: परिवार घरात झोपलेला असताना लाखोंचे दागिने लंपास

शिवसेना साधारण आता संधी

शिवसेनेने आता भाजपला पूर्णपणे घेरण्याची तयारी सुरू केली आहे. येत्‍या १२ मे रोजी महासभा होत आहे. यात घरकुल प्रकरणात दोषी असलेल्या भाजपच्या पाच नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका व्यापारी संकुलातील गाळ्यांचा प्रश्‍न निकाली काढून भाजपला शह देण्याची खेळी करण्यात येणार आहे. तसेच शिवसेनेच्या नगरसेवकाच्या प्रभागात अधिक निधी विकासाला देऊन भाजपची कोंडी करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात जळगावात शिवसेना व भाजप असा जोरदार संघर्ष होणार असल्याचे दिसत आहे.