
परिवार घरात झोपलेला असताना लाखोंचे दागिने लंपास
शहादा (नंदुरबार) : मनरद (ता. शहादा) गावात भरवस्तीतील एका घरात घुसून चोरट्यांनी कपाटातील तिजोरी तोडून दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास (robbery) केले. बाजार भावाप्रमाणे सुमारे सहा लाखांचा ऐवज चोरांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी (ता.३) पहाटे एक ते अडीचच्या सुमारास घडली. यासंदर्भात शहादा पोलिस ठाण्यात (shahada police station) संजय पाटील यांचा फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. (home robbery and jewellery)
मनरद गावात संजय पाटील यांचे भरवस्तीत घर असून श्री. पाटील यांच्या साडूकडे लग्नानिमित्ताने संजय पाटील यांनी पत्नीसाठी सोन्याच्या बांगड्या, गळ्यातील सोन्याची पोत (चैन) असे सुमारे दहा तोळ्याचे सोन्याचे साहित्य घरी आणून कपाटात ठेवले होते. दोन दिवसांपूर्वी पाटील यांचा मुलगा व सून सुरत येथे खासगी कामानिमित्त निघून गेले.
हेही वाचा: अफवांचा पेव म्हणून घरच्यांचा विरोध; तीने मात्र झुगारला अन् केले लसीकरण
दरवाजा दिसला उघडा
घरात वृद्ध वडील, आई हे खालच्या रूममध्ये झोपले होते तर संजय पाटील व त्यांच्या पत्नी वरच्या मजल्यावर रात्री झोपण्यास गेले होते. संजय पाटील यांच्या अर्धांगिनी (ता.३) पहाटे साडेतीन चारच्या दरम्यान घरातील दैनंदिन कामकाजासाठी उठल्यानंतर त्यांना घराच्या मागचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी तातडीने त्यांच्या सासूबाई व सासऱ्यांना झोपेतून उठवून दरवाजा उघडा केला होता का? अशी विचारणा केली. मात्र त्यांनी आपण दरवाजा उघडला नसल्याचे म्हटले.
हेही वाचा: रक्ताचे नाते दुरावले, अश्रूही आटले !
खोलीत जावून पाहिल्यावर बसला धक्का
तातडीने पतीला हाक मारून घटनेची माहिती दिली. घरात येऊन पाहतात तर कपाट व तिजोरी उघडे आढळले. तिजोरीतील दहा तोळे सोन्याच्या वस्तू या चोरीस गेल्याचे लक्षात येताच संजय पाटील यांनी तत्काळ गावातील पोलिस पाटील यांना घटनेची माहिती देऊन सकाळी शहादा पोलिस ठाण्यात या बाबत माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक नीलेश वाघ व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. याचवेळी नंदुरबार येथील श्वानपथकाला पाचारण केले. पोलिस प्रशासनाने संजय पाटील व कुटुंबाची पूर्ण विचारपूस केल्यानंतर पुढील तपासाची चक्र गतिमान केली आहेत. भरवस्तीत असलेल्या घरातून ऐवज चोरीला गेल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Web Title: Marathi Nandurbar News Shahada Home Robbery And
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..