
रूग्णाने मध्यरात्रीनंतर गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याचे बोलले जात आहे. रूग्णालयातील वॉर्ड क्रमांका सहामध्ये हा प्रकार घडला. सदर बाब वार्डात उपस्थित कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.
जळगाव : कोरोना व्हायरसची भिती प्रत्येकाच्या मनात आहे. अशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांमध्ये तर जास्तच भितीचे वातावरण आहे. अशात भितीपोटी रूग्ण टोकाची भुमिका घेत असतात. असाच प्रकार जिल्हा कोविड रूग्णालयात घडला असून कोरोना संशयीत असलेल्या एका रूग्णाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
कोविड रूग्णालय अर्थात शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातल्या जिल्हा कोविड रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक सहामध्ये दाखल कोरोना संशयीत रूग्णाने गळफास घेवून आत्महत्या केली. या रूग्णाने मध्यरात्रीनंतर गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याचे बोलले जात आहे. रूग्णालयातील वॉर्ड क्रमांका सहामध्ये हा प्रकार घडला. सदर बाब वार्डात उपस्थित कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांकडून तपास सुरू
जिल्हा रूग्णालयातील स्वच्छतागृहात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या विषय बरेच दिवस गाजला होता. यानंतर कोरोना संशयीत रूग्णांच्या वॉर्डात रूग्णाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. वॉर्डात छताला लटकणारा मृतदेह पाहून अन्य रूग्णांमध्ये धावपळ उडाली. त्यांनी बाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांना सदर प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांना बोलाविण्यात आले. रूग्णाने आत्महत्या कोणत्या कारणाने केली याचे कारण स्पष्ट झाले नसून पोलिस पुढील तपास करत आहेत.