खासगी कोविड रुग्णालयांवर १८ लेखापरिक्षकांची नियुक्ती : जिल्हाधिकारी राऊत 

देविदास वाणी
Tuesday, 4 August 2020

खासगी रुग्णालयांना ८० टक्के बेड कोविड बाधीत रुग्णांवर उपचारासाठी राखीव ठेवायचे आहेत. नियुक्ती लेखा परीक्षकांनी वैद्यकीय देयकांचे रँडम बेसीसवर व तक्रारीच्या अनुषंगाने लेखा परीक्षण करावयाचे आहे. दरदिवशी दहा टक्के किंवा १० रुग्णांचे देयकांचे लेखा परीक्षण करावयाचे आहे.

जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यात खासगी कोविड हॉस्पिटलमधून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या बिलांच्या ऑडिटसाठी १८ ऑडिटर अधिकाऱ्यांची नियुक्ती आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली आहे. 

या खासगी रुग्णालयांना ८० टक्के बेड कोविड बाधीत रुग्णांवर उपचारासाठी राखीव ठेवायचे आहेत. नियुक्ती लेखा परीक्षकांनी वैद्यकीय देयकांचे रँडम बेसीसवर व तक्रारीच्या अनुषंगाने लेखा परीक्षण करावयाचे आहे. दरदिवशी दहा टक्के किंवा १० रुग्णांचे देयकांचे लेखा परीक्षण करावयाचे आहे. त्याबाबतचा अहवाल नोडल अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण यांना द्यावयाचा आहे. 

आदेशानूसार जळगाव येथील गोल्ड सिटी हॉस्पिटल, ओम क्रिटीकल हॉस्पिटलसाठी जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी रवींद्र जोशी, जिल्हा ग्राहक मंचचे सहाय्यक लेखाधिकारी राजेंद्र मावळे, स्थानिक निधी लेखा परिक्षणचे एम.सी.बिऱ्हाडे यांची, रुबी हॉस्पिटल, अनूश्री हॉस्पिटलसाठी जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण आहार योजनेचे लेखाधिकारी शामकांत न्याहाळदे, वेतन व भविष्य निधी निधी पथकाचे सहाय्यक लेखाधिकारी हेमंत निंबाळकर, स्थानिक लेखा विभागाचे पी.आर.कुमावत यांची नियुक्ती झाली आहे. अमळनेर येथील श्रीदत्त हॉस्पीटल, बहुगुणे हॉस्पिटलवर स्थानिक निधी लेखा विभागाचे लेखाधिकारी जितेद्र राठोड, सहाय्यक लेखाधिकारी गजानन देशमुख, वरिष्ठ लेखा परिक्षक आर.डी.चौधरी यांची तर जळगावच्या लोकसेवा हॉस्पिटल, अमळनेरच्या नर्मदा फाउंडेशनवर लेखा परीक्षक म्हणून जिल्हा नियोजन विभागातील लेखाधिकारी कैलास सोनार, सहाय्यक लेखाधिकारी पी.पी.महाजन, कनिष्ठ लेखा परीक्षक एस. आर. बुरकूल यांची, अमळनेर येथील वरद विनायक हॉस्पिटल, पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलवर तापी महामंडळाचे लेखाधिकारी राजेश देशमुख, साहाय्यक लेखाधिकारी भिमराव महाले, पी.व्ही. हरीमकर यांची, जळगावच्या चिन्मय हॉस्पीटल, द्वारका हॉस्पिटलवर अप्पर कोषागार अधिकारी एस.आर.नारखेडे, सहायक लेखाधिकारी अरुण धांडे, कनिष्ठ लेखा परीक्षक ए.यू.महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon covid private hospital Accountants selection collector raut