घनकचरा प्रकल्पाचा सुधारीत आराखडा करावा लागणार; उपमहापौरांनी दिली भेट 

भूषण श्रीखंडे
Tuesday, 17 November 2020

लोकांनी बायोमायनिंगपुर्वी परिसरात दुर्गंधी आणि चिलटे किटक यांचा त्रास मोठया प्रमाणावर सहन करावा लागत होता अशी आशी व्यथा नागरिकांनी मांडली यावर प्रशासकीय दिरंगाई बद्दल उपमहापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

 जळगाव ः गेल्या काही दिवसापासून जळगाव शहरातील नविन नियोजीत घनकचरा प्रकल्पाचा मुद्दा तापलेला आहे. मुदत संपून देखील अजूनर्पयंत प्रकल्पाला सुरवात झाली नाही. याबाबत आज निमखेडी शिवारात उभारण्यात येणाऱ्या नियोजित प्रकल्प स्थळाला उपमहापौर सुनिल खडके यांनी आज भेट दिली. यावेळी महापालिकेचे प्रकल्प प्रमुख योगेश बोरोले उपस्थित होते.

वाचा- मामाच्या घरी भाऊबीजला भाचा आला आणि शेततळ्यात जीव गमावून बसला -

महानगरपालिका नियोजित प्रकल्पस्थळी डंपिग केलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग आणि प्रकल्प उभारणी या दोघांसाठी स्वतंत्र मक्ते देण्यात आलेले आहेत. मात्र मुदत संपुनही हे दोन्ही प्रकल्प पुर्ण झाले नसल्याने उपमहापौरांना भेटी दरम्यान समोर आले. याबाबत उपमहापौरांनी नाराजी व्यक्त करत नंतर त्यांनी आयुक्त सतिश कुलकर्णी यांची नंतर भेट घेतली. यावेळी प्रकल्प आराखडयात फेरबदल करणे आवश्यक झाल्याने प्रकल्पाचे काम रखडल्याची माहिती समोर आली सुधारित आराखडा तयार करुन तो त्वरीत महासभेसमोर ठेवण्याच्या सुचना सुनिल खडके यांनी प्रशासनास दिल्या आहेत. तसेच  या कामातील विलंबामुळे तसेच नविन कचरा डंपिगचे काम सतत सुरुच असल्यानेही प्रकल्प उभारणीचे काम सुरु करण्यात अडचणी आहेत. नविन कचरा डंप करतांना प्रकल्पाला अडथळा निर्माण होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सुचना उपमहापौरांनी स्वच्छता विभागाला दिल्या.

बायोमायनिंगचे काम संशायस्पद 
प्रकल्पस्थळी डंपिग करण्यात आलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग करण्यासाठी ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंन्ट यांना मक्ता दिलेला आहे. मात्र कोरोना काळामुळे हे काम अद्याप 63 टक्के इतकेच होऊ शकलेले आहे. अशी माहिती प्रकल्प अभियंता योगेश बोरोले यांनी उपमहापौरांनी दिली. तसेच प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीसाठी मंजूर १२ कोटी पैकी आतापर्यंत केवळ ४० लक्ष रूपये खर्च होऊ शकले आहेत.तसेच डंपीग ठिकाणी असलेला कचरा तसेच नविन घनकचरा प्रकल्पाचे दोन्ही कामे संशयास्पद असल्याचे उपमहापौर श्री खडके यांनी आयुक्तांना चर्चे दरम्यान सांगितले.

प्रकल्पाजवळील नागरिकांशी केली चर्चा
उपमहापौर खडके यांनी घनकचरा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर प्रकल्पाजवळील लोकवस्तीला भेट दिली. त्यावेळी लोकांनी बायोमायनिंगपुर्वी परिसरात दुर्गंधी आणि चिलटे किटक यांचा त्रास मोठया प्रमाणावर सहन करावा लागत होता अशी आशी व्यथा नागरिकांनी मांडली यावर प्रशासकीय दिरंगाई बद्दल उपमहापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सुधारीत आराखडा करावा लागणार
साइट वरील प्रत्यक्ष स्थिती आणि जुन्या आराखडयात असलेल्या काही त्रुटी विचारात घेऊन प्रकल्प अहवालात काही सुधारणा आवश्यक झाल्या आहेत. त्यामुळे प्रकल्प उभारणीच्या कार्यात अडसर असल्याची बाब समोर आल्याने प्रकल्प अहवाल सुधारीत करण्याचा प्रस्ताव निर्णयासाठी त्वरीत महासभेसमोर ठेवण्याच्या सुचना उपमहापौरांनी दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Deputy Mayor Sunil Khadke visited the solid waste project and gave instructions to prepare a new plan.