माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी फडणवीसांनी पोलिसांना केला फोन - खडसे

भूषण श्रीखंडे
Wednesday, 21 October 2020

पोलीस सुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. मात्र स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करून गुन्हा दाखल करण्यास सांगितले.

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला जय श्रीराम केला असून पक्ष सोडता सोडता त्यांनी देवेेद्र फडवीसांवर गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाले, की फडणवीस यांच्या सांगण्यावरून माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

आवश्य वाचा- देवेंद्र फडणवीसांनी माझे आयुष्य उद्धवस्थ केल्यामुळेच भाजप पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला - खडसे

भाजप सदस्याचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी त्यांच्या मुक्ताईनगरमध्ये पत्रकार परिषद घेवून पक्ष सोडल्याची अधिकृत घोषणा केली. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मला पक्ष सोडण्याची वेळ आली असून त्याच्यांमुळेच माझे आयुष्य उध्दवस्थ केले. त्यामुळे पक्ष सोडावा लागत असल्याचे सांगत असतांना खडसे भावनीक झाले. 

 

फडवीसांच्या सांगण्यावरूनच विनयभंगाचा गुन्हा 

अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप करीत मुंबईच्या सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रात्रभर गोंधळ घातला. आरोपात तथ्य नसल्याने पोलीस सुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. मात्र स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करून गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते, अशी खळबळजणक माहिती खडसेंनी पत्रकार परिषेदत दिली.

 

फडणवीसांना विचार होता जाब
खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल का करण्यात आला मी असे फडवीसांना विचारले. तेव्हा नाईलाजाने तक्रार दाखल करावी लागली, असं उत्तर फडणवीस यांनी दिले. मात्र पोलिसांना तपास करून तक्रार दाखल करा, असं फडवीस सांगू शकत होते. पण, फडवीसांनी अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण केले आहे  अशी टीका खडसेंनी केली.

आर्वजून वाचा- खडसेंचा भाजपला ‘जय श्रीराम’, राष्ट्रवादीत प्रवेशाची केवळ औपचारिकता
 

माझ्या राजीनाम्याची भाजपलाच होती घाई 

काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कोणताही पक्षा असेल त्यांनी माझ्यावर झालेल्या आरोपांबाबत राजीनामा आणि चौकशीची मागणी केली नव्हती. पण भाजपने माझ्या राजीनाम्याची मागणी केली आणि राजीनामा घेतला. त्यानंतर मी चारवर्ष तणावात काढले. त्यात कथित पीएवर नऊ महिने पाळत ठेवून त्याला अडकवीणे असे सगळे प्रकार फडवीसांनी केले असे धक्कादायक आरोप खडसेंनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon devendra fadnavis called the police to file a case of molestation against me eknath khadse allegation