देवेंद्र फडणवीसांनी माझे आयुष्य उध्वस्त केल्यामुळेच भाजप पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला - खडसे

भूषण श्रीखंडे
Wednesday, 21 October 2020

मी पक्षावर व कार्यकारणीवर नाराज नाही. परंतू देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रमाणे माझी राजकीय आयुष्य उध्वस्त  करण्याच प्रयत्न केला. त्यामुळे मी चार वर्ष मानसीक तणावाखाली घालवली.  

जळगाव : भाजप पक्षावरील व प्रदेश कार्याकारणीव मी नाराज नसून माझा देवेंद्र फडवणीरावर नाराजी आहे. त्यांनी माझे आयुष्य उध्वस्त  केले असून मी केवळ फडवीसांमुळे हा पक्ष सोडत आहे असे आरोप देवेंद्र फडवीसावर एकनाथराव खडसेंनी पत्रकार परिषदेते आज केले. 

आवश्य वाचा- खडसेंचा भाजपला ‘जय श्रीराम’, राष्ट्रवादीत प्रवेशाची केवळ औपचारिकता 

भाजपचे नाराज एकनाथराव खडसे हे गेल्या महिनाभरापासून राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा सुरु असताना अखेर भाजपतील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी आज पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी मुक्ताईनगर येथील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद आज घेतली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडवीस यांच्यावर टिकास्त्र सोडले. माझ्या सोबत अनेकांसोबत मी चाळीस वर्षापासून पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. त्यासाठी गावांगोव पिंजून काढली. कतृत्वाच्या ताकदीवर विविध पदे मिळवीली, कोणी उपकाराने दिलेली नाही. मी पक्षावर व कार्यकारणीवर नाराज नाही. परंतू देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रमाणे माझी राजकीय आयुष्य उद्धवस्थ करण्याच प्रयत्न केला. त्यामुळे मी चार वर्ष मानसीक तणावाखाली घालवली.  वेळोवेळी पक्षाकडे माझी भूमीका मांडली. परंतू यावर कोणी दखल घेतली नाही त्यामुळे केवळ फडवीसांमुळे पक्ष सोडत आहे. 

पक्षावर नाराज नाही 

खडसे पत्रकार परिषेद बोलतांना म्हणाले, मी भाजपवर व पक्ष कार्यकारणीवर नाराज नाही. भाजपने दिलेली पदे मी यश्वी पार पाडले. परंतू फडणवीसांच्या कारस्थानामूळेच पक्ष सोडत असल्याचे सांगितले.

    

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon eknathrao khadse had to leave BJP due to Devendra Fadnavis