esakal | धनत्रयोदशीला सोने बाजाराची चकाकी 
sakal

बोलून बातमी शोधा

gold market jalgaon

दिपावलीच्या पर्वास कालपासूनच सुरवात झाली. आगामी पाच दिवस दिवाळीचे असल्याने सराफ बाजारात झळाळी येणार आहे.

धनत्रयोदशीला सोने बाजाराची चकाकी 

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव : दिवाळीच्या दिपोत्सवाच्या पर्वात आज धनत्रयोदशी आहे. साडेतीन मुहूर्ता पैकी एक असलेला मुहूर्त. या दिवशी सोने खरेदीस नागरिक पसंती देतात. यामुळे आज सकाळ पासून सराफ बाजारातील सर्व सराफ दुकानात तोबा गर्दी झाली होती. १५ ते २९ ग्रॅम च्या दागिन्यांना मोठी मागणी होती. उद्याच्या (ता.१४) लक्ष्मीपूजनासाठी विविध साहित्यांच्या खरेदीसाठी बाजार फुलला होता. 
 

धनत्रयोदशीला सोन घेऊन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सोन्याची पूजा केली जाते. सुवर्ण बाजरात सोने चांदीचे शिक्के, लक्ष्मी सरस्वती, गणेशाचे सोन्याचे शिक्केना मोठी मागणी आहे. या दिवशी सोनेखरेदीचा कल ओळखून सराफ बाजारात सोन्याचा तुकडा, महालक्ष्मीचे सोन्याचे शिक्के, विविध डिजाईनचे दागिने तयार करण्यावर सराफांचा भर दिसून येतो. गेल्यावेळी पेक्षा यावर्षी सोन्याचा भाव जास्त असला तरी सोने खरेदी चांगली होणार आहे. 

पाडवा, भाऊबीज एकाच दिवशी 
आज धनत्रयोदशी, यमदीपदान आहे. या दिवशी व्यापारी खतावणी खरेदी करतात. त्यासाठी सकाळी ८.३० ते ११.३० आणि दुपारी १ ते २.३० तसेच सायंकाळी ७.३० ते ९ असे मुहूर्त आहे. तर शनिवारी नरक चतुर्दशी असल्याने सकाळी अभ्यंगस्नानासाठी ५.३१ पासून मुहूर्त आहे. याच दिवशी लक्ष्मीपूजन असून, सायंकाळी ५.५९ ते ८.३३ लाभ मुहूर्त तर ९ ते १२ यावेळेत अमृत मुहूर्त आहे. तर सोमवारी भाऊबीजेनिमित्त भावाचे औक्षण केले जाणार आहे. 

पुर्वसंध्येला बाजारात गर्दी 
लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मीची मुर्ती, नवीन केरसूणी, प्रसादासाठी साळी्चया लाहया, बत्ताशे यासह विविध प्रकारचे खाद्य पदार्थ, मिठाई खरेदासाठी नागरिकांनी बाजात गदी केली होती. झेडूंच्या फुलांचा दर १५० रूपये किलो होता. आज झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली होती. 

सोन्याचा दर आज ५१३०० प्रती तोळा, तर चांदी ६६५००प्रती किलो होती. दर कमी झाल्याने अनेकांनी गुंतवणूक म्हणुन सोने खरेदी केले. सोबत विविध प्रकारचे आकर्षक फॅन्सी दागिने खरेदी केले. दहा ते पंधरा ग्रॅमच्या सोन्याच्या दागिन्यांना मागणी होती. 
 
सुशील बाफना, संचालक, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स 

संपादन ः राजेश सोनवणे