esakal | महाजनांनी लसींचा साठा मिळून दिला..तर जाहीर सत्कार करू

बोलून बातमी शोधा

महाजनांनी लसींचा साठा मिळून दिला..तर जाहीर सत्कार करू
महाजनांनी लसींचा साठा मिळून दिला..तर जाहीर सत्कार करू
sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः पच्छिम बंगलामध्ये नुकताच निवडणूका झाल्या या आणि प्रचारात केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी रथा गिरीश महाजन यांना बोलावले होते. परंतू त्यांचे वाढलेल्या या वजनाचा त्यांनी महाराष्ट्राला जास्ती जास्त लसी मिळावी यासाठी वापर केला पाहीजे. जर असे झाले तर त्यांचा भर चौकात सत्कार करू असा खोचक टोला पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांना लगावला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वाजारोहन कार्यक्रम झाला. यावेळी मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य सरकार लसी बाबत राजकरण करत असल्याचा आरोप महाजन यांनी केला होता. त्यावर बोलतांना मंत्री पाटील म्हणाले, की कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारा कोटी लस द्या, आम्ही एकरकमी पैसे देतो. त्यामुळे लस देणारे केंद्र सरकार आहे हे महाजनांना देखील माहित आहे. त्यामुळे नेमके कोण राजकारण करतयं हे महाजनांना चांगल माहित आहे.

आपल्याकडे सक्षम यंत्रणा पण...

राज्यातील आरोग्य विभागाची यंत्रणा लसीकरणासाठी सक्षम आहे. परंतू केंद्राकडून लसी मिळत कमी मिळत असल्याने कसे काय लसीकरण पूर्ण होणार. केंद्रात महाजनांचे वजन वाढले असेल तर त्यांनी राज्याला जास्ती जास्त लसी मिळण्यासाठी त्याचा वापर करावा.

तर आम्ही जाहीर सत्कार करू

पच्छीम बंगालमध्ये निवडणूकीच्या प्रचारात केंद्रीय गृह मंत्री यांच्या रथावर गिरीश महाजनांचे जर वजन वाढले असेल तर त्यांनी त्याचा वापर राज्यासाठी करावा. आणि केंद्रातून राज्यासाठी जास्ती जास्त लसी उपलब्ध करून द्यावा. असे जर महाजनांनी केले तर त्यांचा जाहीर सत्कार करू असे टोला मंत्री पाटील यांनी महाजनांना लगावला.

ममता दिदीच येणार

पच्छिम बंगालच्या निवडणूकीत जे एक्झिट पोल दाखविले आहे त्यानुसार ममता बॅनर्जी यांचा विजय होणार आहे. आणि भाजला धक्का बसणार आहे असे दिसते असे मंत्री पाटील म्हणाले.