
अॅड.पाटील हे जेष्ठ संचालक त्यांचा राजीनामा नामंजूर-रोहिणी खडसे
सावदा: जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताई सहकारी साखर कारखान्याला (Shri Sant Muktai Sahakari Sugar Factory) दिलेल्या कर्जाच्या माहितीसाठी ईडीने (ED) 'लेटर बॉम्ब' टाकल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Jalgaon District Central Co-operative Bank) एकच खळबळ उडाली. ईडीच्या पत्राची चर्चा थांबत नाही तोच बँकेचे ज्येष्ठ संचालक अॅड.रवींद्र पाटील (Senior Director Adv. Ravindra Patil) यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा (Resigned) दिला. त्यामुळे जिल्हा बँक पुन्हा एकदा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आली. बँकेतील 'राजकारण' तापल्याने नाराज झालेले अॅड. पाटील यांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली.
हेही वाचा: राजोरा गावात शंभर टक्के लसिकरण; जळगाव जिल्ह्यातील पहिले गाव
बँकेचे ज्येष्ठ संचालक असलेले अॅड.रवींद्र पाटील यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षही आहेत. जिल्हा बँकेने मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताई संस्थानला दिलेल्या कर्जाच्या सेटलमेंटच्या विषयाबाबत बँकेकडून कार्यवाही होत नसल्याने अॅड.पाटील हे नाराज होते. याच नाराजीतून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. एकीकडे ईडीने जिल्हा बँकेला मुक्ताईनगर साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाच्या विषयाबाबत नोटीस बजावलेली असतानाच दुसरीकडे ज्येष्ठ संचालक अॅड. रवींद्र पाटील यांनी राजीनामा दिल्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: अमळनेरमध्ये १०५ फुटांवर फडकला "तिरंगा"
दोघी नेते व्यासपीठावर एकत्र..
अश्या पार्श्वभूमीवर बँकेच्या अध्यक्षा अड.रोहिणी खडसे आणि अॅड.रवींद्र पाटील हे दोघे नेते येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आले असता दोघांना पत्रकारांनी प्रश्न विचारले सुरुवातीस दोघे बोलण्यास तयार नव्हते. पण पत्रकारांनी आग्रह धरल्याने दोघे बोलते झाले. यावेळी संचालक पदाचा राजीनामा दिलेले अॅड.पाटील म्हणाले मी दिलेल्या राजीनाम्यात कोणतेही राजकारण नाही. काही अडी अडचणी असतील तर त्याबाबत नाथाभाऊ यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ. मुक्ताई संस्थांच्या कर्ज फेडी बाबतीत वन टाईम सेटलमेंटचा विषय हा सन २०२० पासून आहे.या बाबतीत कायदेशीर बाबींचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाईल असे म्हणाले. तर जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या की रवींद्र पाटील हे बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान जेष्ठ संचालक,पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांना बॅक कारभाराचा अनुभव आहे. आम्ही एकाच राजकीय परिवारातील आहोत कोणताही वाद नाही.
हेही वाचा: जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; भाजपची मागणी
राजीनामा नामंजूर केला
अॅड.रवींद्र पाटील यांनी आपल्या संचालकपदाचा राजीनामा विषया संदर्भात माहिती देताना अॅड.रवींद्र पाटील यांनी सांगितले की,मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव राजानामा दिला आहे तर जिल्हा बँक अध्यक्षा रोहीणी खडसे यांनी राजीनामा नामंजुर केला असल्याचे सांगितले.
Web Title: Marathi News Jalgaon District Bank Director Resignspresident Rohini Khadse Rejected
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..