खडसेंच्या कन्या चेअरमन असलेल्या बँकेकडून ‘ईडी’ने मागवली माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon District Bank

केंद्रात सहकार खाते नव्याने निर्माण झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंदक्रांत पाटील यांनी केंद्रीय सहकार विभागाकडे राज्यातील काही साखर कारखान्यांतील व्यवहारांसंदर्भात पत्र दिले होते.

खडसेंच्या कन्या चेअरमन असलेल्या बँकेकडून ‘ईडी’ने मागवली माहिती

जळगाव : जिल्ह्यातील एका खासगी साखर कारखान्याला (Sugar factori) कर्जपुरवठासह (Debt) बँकेतील इतर आर्थिक व्यवहारासंबंधात (financial transactions bank) सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने (ED) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून माहिती मागवली आहे. भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांची ईडीकडून चौकशी सुरू असताना, त्यांची कन्या चेअरमन असलेल्या बँकेकडून ही माहिती मागविण्यात आल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: सव्वा वर्ष झाली तरी..महाराष्ट्र-मध्यप्रदेशची एसटी सेवा बंदच


केंद्रात सहकार खाते नव्याने निर्माण झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंदक्रांत पाटील (BJP state president MLA Chandkrant Patil) यांनी केंद्रीय सहकार विभागाकडे राज्यातील काही साखर कारखान्यांतील व्यवहारांसंदर्भात पत्र दिले होते. या पत्रामुळे राज्यात मोठा राजकीय धुराळा उडाला होता. त्या अन्वये ईडीने जिल्हा बँकेकडूनही मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाबाबत माहिती मागवली आहे.

हेही वाचा: केंद्राने नव्हे थेट..युनेस्कोने घेतली अहिराणी भाषेची दखल


कागदपत्रे मागवली
यासंदर्भात बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांना विचारले असता, महाराष्ट्रातील ४० कारखान्यांना दिलेल्या कर्जासंदर्भात विविध बँकांकडून ईडीने माहिती मागविली असून, त्या अन्वये जिल्हा बँकेकडून मुक्ताई साखर कारखान्यास दिलेल्या कर्जाबाबत माहिती मागविण्यात आल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Web Title: Marathi News Jalgaon District Bank Ed Letter By Muktai Sugar Factory Lon Information

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top