एकनाथ खडसे, गिरीश महाजन, देवकरासह दिग्गजांच्या अर्जावर हरकती

Jalgaon District Bank
Jalgaon District Bank
Updated on

जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Jalgaon District Bank Election) एकनाथ खडसे (Eknath Khadse), गिरीश महाजन(Girish Mahajan), गुलाबराव देवकर, आमदार किशोर पाटील, मंगेश चव्हाण, सुरेश भोळे यांच्यासह बहुतांश दिग्गजांच्या उमेदवारीवर (Candidate) हरकत घेण्यात आली आहे. यावेळी जिल्हा बँकेत सुनावणीसाठी मोठी गर्दी झाली होती.

Jalgaon District Bank
जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांबरोबरच मृत्युसंख्येही घट


जळगाव जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या २१ जागांसाठी २७९ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्जाच्या हरकतींवर बुधवारी सुनावणी झाली. मात्र, हरकती मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे प्रत्येक उमेदवारांच्या हरकतीवर बुधवारी सायंकाळपर्यंत सुनावणी सुरू होती. त्यामुळे या हरकतींवर आज गुरुवारी (ता. २१) सकाळी अकराला निकाल देण्यात येणार आहे.


एकनाथ खडसे, आमदार गिरीश महाजन, सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, गुलाबराव देवकर, मंगेश चव्हाण, राजीव देशमुख, प्रदीप देशमुख, रवींद्र पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार अनिल पाटील आदींच्या उमेदवारीवर हरकत घेण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर हरकती आल्याने सुनावणीस वेळ लागला. काही उमेदवारांनी आपली बाजू मांडण्यासाठी वकिलांची नियुक्ती केली होती. सायंकाळी निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी सांगितले, की हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र, प्रत्येक उमेदवाराच्या हरकतीवर निकाल गुरुवारी सकाळी अकराला देण्यात येईल.

Jalgaon District Bank
Jalgaon : घरी बसून मुलं झाली हट्टी अन्‌ उद्धट


आमदार चव्हाणांनी लढविली खिंड
भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी भाजपतर्फे खिंड लढविली. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारावर हरकत घेतली. हरकतीच्या सुनावणीवेळी भाजपच्या उमेदवारांना मार्गदर्शन केले. आवश्‍यक तेथे उमेदवारांना कायदेशीर बाजू मांडण्यासाठी वकिलही उपलब्ध करून देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Who is Tukaram Mundhe?
Crime
Girna River sand mafia latest news
Maharashtra government decides to conduct 'e-Peek Pahani' through appointed assistants from July 15
Marathi News Esakal
www.esakal.com