जळगाव जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यासंबंधी हालचाली

महिनाभरापासून हे निर्बंध लागू असताना कोरोनाचा संसर्गही नियंत्रणात येत असल्याची चिन्हे आहेत.
Close Market
Close MarketClose Market

जळगाव: कोरोनाचे (Corona) दैनंदिन नवे रुग्ण कमी होत असताना आणि सध्या पॉझिटिव्हिटी दोन टक्क्यांच्याही आत असताना निर्बंध शिथिल (Restrictions relaxed) करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव (Proposal to the Government) पाठविण्यात आला आहे. त्यासंबंधी जिल्हा प्रशासनाच्या हालचाली (District Administration) सुरू झाल्या असून, बाजारपेठेची (Market) वेळ वाढवून मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

(jalgaon district corona restrictions relaxed proposal to the government)

Close Market
फक्त सरकार विरोधात बोलण्यासाठी केंद्राचा राणेंना मिळाला लाडू


फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे नवे रुग्ण वाढू लागले आणि दुसऱ्या लाटेला सुरवात झाली. मार्च, एप्रिलमध्ये ही लाट तीव्र झाली. यादरम्यान राज्यात नव्याने लॉकडाउन जारी करण्यात आले. ते मेपर्यंत सुरू राहिले. लाट ओसरू लागल्याची चिन्हे दिसताच लॉकडाउनमध्ये लावलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आले. जूनमध्ये जळगाव जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट बघता बहुतांश निर्बंध शिथिल करून बाजारपेठ खुली करण्यात आली.


पुन्हा निर्बंध लागू
मात्र जूनमध्येच पारोळा तालुक्यातील एका गावातील सात रुग्णांमध्ये कोरोनाचा ‘डेल्टा’ हा नवा व्हेरिएंट संसर्गित आढळून आल्याचे समोर आल्यानंतर पुन्हा काही प्रमाणात निर्बंध कठोर करण्यात आले. त्यात सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंतच दुकाने सुरू ठेवणे, शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाउनमध्ये सर्वच दुकाने बंद असे निर्बंध सुरू होते.

Close Market
उत्तर महाराष्ट्रातील पाणी प्रश्नांवर लवकरच जनआंदोलन उभे राहणार

रुग्णसंख्या अत्यल्प
महिनाभरापासून हे निर्बंध लागू असताना कोरोनाचा संसर्गही नियंत्रणात येत असल्याची चिन्हे आहेत. रोज दोन-तीन हजारांवर चाचण्यांचे अहवाल प्राप्त होत असून, रोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या दहाच्या आतच आहे. पॉझिटिव्हीव्हिटीही घटली असून, त्यामुळे दुकानांची वेळ वाढवून द्यावी, शनिवार व रविवार दुकाने सुरू करण्यासंबंधी परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

प्रशासनाचा प्रस्ताव
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी राज्यभरात अजूनही निर्बंध लागू आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासाठी स्वतंत्र निर्णय होणे कठीण आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासनाने महिनाभरापासून रोज आढळून येणाऱ्या रुग्णांची आकडेवारी सादर करत निर्बंध शिथिल करण्यासंबंधी मान्यतेसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. या प्रस्तावावर राज्य सरकार काय निर्णय घेते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com