esakal | जळगाव जिल्ह्यात मृत्यु सत्र थांबेना, पुन्हा कोरोना 21 बाधितांचा बळी
sakal

बोलून बातमी शोधा

corona

जळगाव जिल्ह्यात मृत्यु सत्र थांबेना, पुन्हा कोरोना 21 बाधितांचा बळी

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा कहर कमी होण्याचा नाव घेत नसून सलग चार-पाच दिवसापांसून २०च्या वर मृत्यू होत आहे. आज देखील २१ जणांचा बळी गेला असून नवीन एक हजार ११५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर एक हजार १०३ रुग्ण बरे झाले. तर आज 11 हजारांवर चाचन्याचे अहवाल प्राप्त झाले.

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या उद्रेक अधिक तीव्र होत आहे. महिनाभरापासून हजार, बाराशेवर नवे रुग्ण समोर येत आहेत. मात्र, गेल्या तीन दिवसांत नवे रुग्ण कमी व बरे होणाऱ्यांची संख्या थोडी जास्त असल्याने चित्र दिसत होते. मात्र आज नविन बाधितांचा आकडा पून्हा वाढला असून आज १हजार ११५ नवीन बाधित रुग्ण आढळले आहे. शनिवारी अकरा हजारांवर चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार ११५ नवे बाधित आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या एक लाख आठ हजार २१८ वर पोचली आहे. तर २४ तासांत एक हजार १०३ रुग्ण बरे झाल्याने बरे होणाऱ्यांचा आकडा ९५ हजार ७९ वर पोचला आहे.

मृत्युदर वाढताच

रुग्णसंख्या जरी स्थिर असली तरी जिल्ह्यातील मृत्युदर वाढतच आहे. सलग तिसऱ्या दिवशी २० रुग्णांचा कोरोनाने बळी गेला. तर आज २१ जणांचा बळी गेला असून त्यात चाळीसगाव येथे तब्बल पाच जणांचा बळी गेला आहे. त्यानंतर बोदवड ४, जळगाव शहर, जामनेर प’त्येकी ३, तर अमळनेर, भुसावळ, जळगाव तालुका, एरंडोल, पाचोरा, यावल तालुका येथे प’त्येकी १ असे २१ रुग्ण दगावले.

जळगाव, भुसावळसह चोपडा संसर्ग

जळगावला शहर २६०, जळगाव ग्रामीण १५, भुसावळ तालुक्यात २०३, अमळनेर १७, चोपडा १२२, पाचोरा ३४, भडगाव १०, धरणगाव ४५, यावल ३८, एरंडोल ५८, जामनेर ६५, रावेर ७७, पारोळा ३१, चाळीसगाव ४६, मुक्ताईनगर ३७, बोदवड ३४ अन्य जिल्ह्यातील ८.

संपादन- भूषण श्रीखंडे